दिवाळी विशेष : शेतकरी गटाची झेंडू उत्पादनात भरारी, दसरा, दिवाळीत मिळाला बाजारभाव

प्रल्हाद कांबळे
Friday, 13 November 2020

कृषी निविष्ठा, भाजीपाला व फुलशेती करण्यासाठी नागापूर येथे बळीराजा शेतकरी गटाची स्थापना झाली. या गटातील शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेत
दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रीस उपलब्ध होईल असे वेळेचे नियोजन करून झेंडू पीक लावण्याचा निर्णय घेतला.

नांदेड : नागापूर (ता. भोकर) येथील आत्मातंर्गत स्थापन झालेल्या बळीराजा शेतकरी गटातील १६ शेतकऱ्यांनी झेंडू फुलांची लागवड केली आहे. दसरा तसेच दिवाळीत बाजार मिळाल्याने खर्च वजा जाता एकरी साडेतीन लाख रुपये शिल्लक राहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले.

कृषी निविष्ठा, भाजीपाला व फुलशेती करण्यासाठी नागापूर येथे बळीराजा शेतकरी गटाची स्थापना झाली. या गटातील शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेत
दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर विक्रीस उपलब्ध होईल असे वेळेचे नियोजन करून झेंडू पीक लावण्याचा निर्णय घेतला. मागील सलग पाच वर्षापासून या
गटातील सर्व शेतकरी झेंडू पिकाची लागवड करतात. या वर्षी गटातील प्रत्येकी एक एकर याप्रमाणे सोळा शेतकऱ्यांनी सोळा एकर व झेंडूची लागवड केली. अष्टगंधा (केशरी रंग) व टेनिस बॉल (पिवळा) अशा वाणांची निवड करून झेंडू फुल लागवड केले. यासाठी बियाणे, खते, औषधी, मशागत व इतर निविष्ठांसाठी एकरी ३२ हजार रुपये खर्च आला. असे गटातील शेतकरी पांडूरंग उलेवाड यांनी सांगितले.
 
सध्या एकरी ३२ क्विंटल झेंडू निघाला आहे

दसऱ्याच्या मुहूर्तावर एकरी पाच क्विंटल झेंडू निघाला. त्यास ५३ रुपये सरासरी दर मिळाला. सध्या एकरी ३२ क्विंटल झेंडू निघाला आहे. या झेंडूला दिवाळीसाठी व्यापाऱ्यांनी बळीराजा गटाशी संपर्क साधून प्रतिकिलो एकशे दहा रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता एकरी तीन लाख ४८ हजार रुपये एकरी निव्वळ नफा मिळाल्याचे अशोक कदम यांनी सांगीतले. गटास तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगीतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali special: Farmers' group produces marigold, Bharari, Dussehra, Diwali got market price nanded news