डाॅक्टरची सामाजीक बांधिलकी : हे कुठले पर्यटनस्थळ नसून प्राथमीक आरोग्य केंद्र 

विठ्ठल लिंगपुजे
Monday, 31 August 2020

प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणी चा बदलला चेहरामोहरा वैद्यकीय अधिकारी कानिफनाथ मुंडे यांच्या योगदानामुळे आरोग्य केंद्राचा परिसर झाला निसर्गरम्य.

शिवणी (ता.. किनवट,जिल्हा नांदेड) शिवणी हा परिसर अतिदुर्गम परिसर म्हणून ओळखला जातो हा भाग डोंगरदऱ्यांनी मनमोहक असलेला परिसर असून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या म्हणीप्रमाणे शासकीय सेवेतील वेळात वेळ काढून महाराष्ट्र शासनाने राबवित असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात दरवर्षी आपले योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासताना दिसत आहेत.

सोबत त्यांनी शिवणी व परिसरातील नागरिकांना रुग्ण सेवा देत असताना आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसर हिरवाईने नटून टाकला आहे या वर्षी 15 ऑगस्ट रोजी या परिसरात दोन हजार व्रक्षाची लागवडही केली आहे त्या सोबत शिवणीच्या या ठिकाणी रुजू झाल्यापासून दर वर्षी लागवड केलेल्या वृक्षांची जोपासना करून उन्हाळ्यातही ही वृक्ष जिवंत ठेवून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे त्यासोबतच त्यांनी स्वतःची अंदाजीत दोन ते अडीच लक्ष रुपये खर्च करून एक बाग तयार केली.

हेही वाचा -  खाकीतील माणुसकी : साडीचोळी देऊन सासरी रवानगी, कुठे ते वाचा ? -

झाडाच्या खोडापासून गणपतीच्या आकाराचा झाडाचे मूळ

या बागेत त्यांनी ते तेंलगणातून विकत झाडे आणून लागवड केली आहे त्यात त्यांनी फळांची फुलांची व औषधांची रोपे आणून लागवड केली ती रोपे या वर्षी उन्हाळ्यात जिवंत ठेवण्यासाठी पाण्याची गरज भासते ते पूर्ण करण्यासाठी अंदाजीत पाच हजार लिटरचे हौदाचे बांधकाम करुण उन्हाळ्यात झाडाला पाणी देण्यासाठी साठवून ठेवत असतात त्यासोबतच या बागेत त्यांनी दोन बदक ही विकत आणले आहेत या बदकाला पोहण्यासाठी व पाणी पिण्यासाठी एक छोटासा तलाव निर्मिती केली आहे त्या सोबत या बागेत एका झाडाच्या खोडापासून गणपतीच्या आकाराचा झाडाचे मूळ असून या मुळाला गणपतीचे कोरीव  काम करून आकार देण्यात येत आहे हे खोडही गणपतीच्या आकाराचे आहे या बागेत कारंजे तयार करण्यात आला आहे एकूणच हा परिसर निसर्गरम्य झाला आहे त्यासाठी या परिसरातील नागरिकांकडून त्याचं कौतुक होताना पाहावयास मिळत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor's Social Commitment: This is not a tourist destination but a primary health center nanded news