
नांदेड : नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होळनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महामूर्ख कवी संमेलनात प्रमुख पाहुण्यांचा मान दोन गर्दभ राजांना देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही गर्दभांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केल्यानंतर बसलेल्या श्रोत्यामधून एकच हास्य पिकले. त्यामुळे या कविसंमेलनाची सुरुवातच झोकात झाली.