'बर्ड फ्लू' ची भीती नको, काळजी घ्यावी- डॉ. मोहम्मद रईशोद्दिन

प्रल्हाद कांबळे
Saturday, 16 January 2021

बर्ड फ्लू हा मुख्यत्वे पक्षांमध्ये आढळणारा आजार आहे. तो आजार मानवामध्ये आढळणारा दुर्मिळ असला तरीसुद्धा आपण सर्वांनी या आजाराची काळजी घेणे आवश्यक आहे.

नांदेड : शहरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की बर्ड फ्लू हा मुख्यत्वे पक्षांमध्ये आढळणारा आजार आहे. तो आजार मानवामध्ये आढळणारा दुर्मिळ असला तरीसुद्धा आपण सर्वांनी या आजाराची काळजी घेणे आवश्यक आहे. बर्ड फ्लू बाबत काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेचे पशु शल्यचिकित्सक डॉ. मोहम्मद रईशोद्दिन यांनी केले आहे.

सध्या राज्यातील मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पक्षांमध्ये बर्ड फ्लू या आजाराचा विषाणू वाढल्याने प्रयोगशाळा तपासणी वरुन निश्चित झाले आहे. बर्ड फ्लू हा मुख्यत्वे पक्षांमध्ये आढळणारा आजार असून तो आजार मानवामध्ये दुर्मिळपणे आढळला असला तरीसुद्धा आपण सर्वांनी या आजाराची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी काही खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असे महापालिकेच्या पशु चिकित्सालय, आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

हेही वाचानांदेड जिल्ह्यातील गाव कारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; सोमवारी फैसला

नागरिकांनी काय करावे 

 • -पक्षांचा श्रावासोबत तसेच विष्टेसोबत संपर्क टाळावा.
 • -पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाद्य दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
 • -शिल्लक उरलेल्या पदार्थाची योग्य विल्हेवाट लावा.
 • -एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करु नका. पशुसंवर्धन अधिकारी यांना ताबडतोब कळवा.
 • -पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा, व्यक्तिगत स्वच्छता राखा.
 • -परिसर स्वच्छ ठेवा. चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मांस आणि हातमोजेचा वापर करा.
 • -पूर्ण शिजलेले मांस खा. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर असे ठिकाण पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

नागरिकांनो हे करु नका 

 • -कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.
 • -अर्धवट शिजलेले चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
 • -आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नका.
 • -पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.
 • -सारखी लक्षणे आढळल्यास महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't be afraid of bird flu, be careful Dr. mohammad nanded news