esakal | रेमडेसिव्हिरसाठी निष्कारण धावपळ करु नका- डॉ. व्यंकटेश काब्दे

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर
रेमडेसिव्हिरसाठी निष्कारण धावपळ करु नका- डॉ. व्यंकटेश काब्दे
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : रेमडिसीव्हरसाठी एवढी प्रचंड धावपळ व स्पर्धा योग्य नाही कारण हे औषध उपयोगी असल्याबद्दलचा निर्णायक पुरावा नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी पाच मानवी चाचण्यामध्ये हे औषध उपयोगाचे नाही असे स्पष्टपणे म्हटले आहे. अमेरिकेच्या संसर्ग रोग संस्थेने देखील रेमडिसीव्हरचा फारसा उपयोग नाही असे म्हटले आहे. त्यामुळे नागरीकांनी रेमडिसीव्हर इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करु नये असे म्हटले आहे. त्याचा फारसा उपयोग होत नाही. अशी आठवण माजी खासदार तथा डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना केली आहे.

डॉ. काब्दे यांनी म्हटले आहे की, रुग्णांमध्ये आॅक्सीजनचे प्रमाण ९३ टक्केच्या खाली असल्यास व जे रोगी गंभीर स्वरुपाने आजारी व आॅक्सीजनवर आहेत. त्यांनाच या औषधाचा थोडाबहूत उपयोग असावा असा आजवरच्या मानवी चाचण्या व संशोधनाचा निष्कर्ष आहे.

हेही वाचा - प्राणीशास्त्रात त्यांनी पीएचडी. घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नाट्यशास्त्रात पदवी घेऊन रंगभूमीवरील आपली आवड सिद्ध केली होती. विविध विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांच्या एकांकिकांनी पारितोषीके पटकाविली.

महाराष्ट्राच्या शासनरचित कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनीही ता. सात एप्रिलला म्हटले आहे की, ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यासाठी कोणत्याही औषधाचा फारसा उपयोग नाही. ज्या रुग्णात आॅक्सीजनचे प्रमाण ९३ टक्के पेक्षा कमी होत आहे, अशा रुग्णांना आॅक्सीजन, स्टिरॉईड, पालथे झोपणे व इतर सहाय्यक औषधींचा उपयोग होतो. या गोष्टी लक्षात घेऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अनाठाई धावपळ थांबवावी असे आवाहन माजी खासदार तथा ज्येष्ठ फिजिशियन व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले आहे.

रेमडेसिव्हिरचा काळा बाजार थांबवावा

दि. ब्रूक फार्मा या कंपनीकडून महाराष्ट्र भाजपने रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदी केल्याचा दावा विरोधी पक्ष नेते फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केला आहे. हे कृत्य बेकायदेशीर आहे आणि कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नांदेड जिल्हा जनता दलाने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे