esakal | २४ तासात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट 

बोलून बातमी शोधा

File Photo

शुक्रवारी (ता. ३१) प्रलंबित असलेल्या संशयित अहवालापैकी शनिवारी (ता. एक) सायंकाळी एक हजार २८१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ८८ अहवाल निगेटिव्ह तर १४७ संशयित व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४८ रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

२४ तासात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट 
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा मोठा धक्का दिला असून जिल्ह्यात शनिवारी (ता. एक) देखील शतकी रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. गत २४ तासांमध्ये तब्बल १४७ रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतू त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. 


शुक्रवारी (ता. ३१) प्रलंबित असलेल्या संशयित अहवालापैकी शनिवारी (ता. एक) सायंकाळी एक हजार २८१ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ८८ अहवाल निगेटिव्ह तर १४७ संशयित व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४८ रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दुसरीकडे पुन्हा दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. आत्तापर्यंत जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या एक हजार ९८६ वर पोहचली आहे. ४८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८३ एवढी झाली आहे. 

हेही वाचा- मुखेडच्या चांडोळा सज्जाचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

२५२ स्वॅब तपासणी प्रलंबित

शुक्रवारी (ता. ३१) १५४ बाधीत रुग्ण आढळल्याने शनिवारी नांदेडला दिलासा मिळेल, असे वाटत होते. परंतु मागील २४ तासात पुन्हा जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक हजार ९८६ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून सध्या ९५७ बाधीत रुग्णावर उपचार सुरु आहेत. शनिवारी (ता.एक) २५२ इतके स्वॅब तपासणीसाठी प्रलंबित असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील दररोज कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने परसत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाची दिवसेंदिवस चिंता वाढतच आहे. 

हेही वाचा- कोरोनात प्रशासनाला मिळत आहे ‘या’ वाहनाची साध...कोणत्या ते वाचा ​

शुक्रवारी सर्वाधिक एक हजार २८१ नमुन्यांची तपासणी 

दरम्यान, शुक्रवारी (ता. ३१) आरटीपीसीआर व ॲन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून सर्वाधिक म्हणजे एक हजार २८१ नमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आली. यातून आरटीपीसीआर टेस्टमध्ये ९६ तर ॲन्टीजेनद्वारे ५१ बाधीत रुग्ण आढळून आले. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १३१, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ३३४, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ४४, नायगाव कोविड केअर सेंटर येथे २४, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १८, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ९२, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ५९, लोहा कोविड केअर सेंटर येथे पाच, हदगाव कोविड केअर सेंटर ५०, भोकर कोविड केअर सेंटर चार, कंधार कोविड केअर सेंटर येथे १३, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ५९, किनवट कोविड केअर सेंटर येथे पाच, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे तीन, खासगी रुग्णालयात १०५ बाधित व्यक्ती उपचार घेत असून सहा बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे एक बाधित, हैदराबाद येथे दोन तर मुंबई येथे दोन बाधित संदर्भित झाले आहेत. 

कोरोना मीटर 

- एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - एक हजार ९८६ 
- आज शनिवारी - १४७ जण बाधीत 
- आज शनिवारी दोघांचा मृत्यू 
- आज शनिवारी ४८ रुग्णांना सुटी 
- रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ९५७ 
- आत्तापर्यंत बरे झालेले रुग्ण - ९३५ 
- एकूण मृत्यू - ८३