Nanded News : रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहण; लोकप्रतिनिधींसह अनेक संघटनांच्या प्रयत्नांना यश
Indian Railways : छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर मंजुरी मिळाली आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यांनंतर केंद्र सरकारने यासाठी जमीन अधिग्रहणाचा अध्यादेश जारी केला आहे.
नांदेड : दक्षिण मध्ये रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहणाचे अध्यादेश केंद्र सरकारकडून काढण्यात आलेले आहेत.