नांदेडचे डॉ . जगदीश कुलकर्णी सोलापुर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर

प्रल्हाद कांबळे
Friday, 13 November 2020

डॉ. जगदीश कुलकर्णी मागील एकवीस वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असून त्यांनी सहायक ग्रंथपाल, उपग्रंथपाल व ग्रंथपाल ( प्राध्यापक समकक्ष ) अशा विविध पदावर काम केलेले आहे.

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्राचे प्रभारी संचालक व ग्रंथपाल डॉ. जगदीश कुलकर्णी ( हाळदेकर ) यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापिठाच्या ग्रंथालय व माहितीशास्र अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नुकतीच नियूक्ती झाली आहे.

डॉ. जगदीश कुलकर्णी मागील एकवीस वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असून त्यांनी सहायक ग्रंथपाल, उपग्रंथपाल व ग्रंथपाल ( प्राध्यापक समकक्ष ) अशा विविध पदावर काम केलेले आहे. मागील आठ वर्षापासून ते ज्ञान स्त्रोत केंद्राचे ( विद्यापीठ ग्रंथालयाचे ) प्रमुख म्हणून काम पाहत असून या काळात ग्रंथालयाने भरीव प्रगती केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले व प्रकुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनात ग्रंथालयातील प्रबंध डिजीटायझेशन विशेषतः युजीसी ईन्फ्लिबनेटच्या शोधगंगा व शोधगंगोत्री प्रकल्पात उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे.

हेही वाचा सचखंड गुरुद्वारा : तख्तस्नान सोहळा, एक ऐतिहासिक धार्मिक प्रथा ! -

विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य, ज्ञान स्रोत समितीचे सदस्य सचिव व अशा विविध समितीवर त्यांनी काम केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व राजर्षी शाहू महाविद्यालय ( स्वायत्त ) लातूरच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळावर ते यापूर्वीच कार्यरत आहेत.

या नियुक्तीवर त्यांनी आनंद व्यक्त केला असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, प्रकुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन,  कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, ज्ञान स्त्रोत समिती सदस्य व ज्ञानस्त्रोत केंद्रातील कर्मच्याऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याच बरोबर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ . मृणालिनी फडवणिस, प्रकुलगुरु डॉ. देवेंन्द्रनाथ मिश्रा,    कुलसचिव डॉ. विकासघुटे, सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांचे दिलेल्या संधी बद्दल ऋण व्यक्त केले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Jagdish Kulkarni of Nanded on the Board of Studies of Solapur University nanded news