esakal | नांदेडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती; शहरातील हजारो अॅटोवरील सुविचार अनेकांच्या तोंडी

बोलून बातमी शोधा

file photo

विजय रणविरकर हे दरवर्षी भीम जयंतीनिमित्त विधायक असे काम करत असतात. समाजावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी ते सतत धडपडत असतात

नांदेडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती; शहरातील हजारो अॅटोवरील सुविचार अनेकांच्या तोंडी
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील प्रसिद्ध चित्रकार तथा उपक्रमशिल व्यक्तीमत्व विजय रणवीरकर यांनी शहरातील हजारो ऑटोच्या पाठीमागे भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार मोफत लिहून त्याचा प्रसार करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल आंबेडकरी जनतेत व आंबेडकरी विचारवंतामधून कौतुक होत आहे.

विजय रणविरकर हे दरवर्षी भीम जयंतीनिमित्त विधायक असे काम करत असतात. समाजावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी ते सतत धडपडत असतात. शहराच्या चैतन्यनगर भागात त्यांची विजू आर्ट या नावाने फर्म चालते. त्यांनी यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील स्ट्रीट लाईटच्या खांबावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासासंबंधात होर्डींग्ज लावले होते. त्यावेळेस अनेक चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या. संबंध शहरभर बाबासाहेबांच्या विचाराचा गवगवा ऐकावयास मिळत होता. 

हेही वाचा - रेमडेसिव्हीरसाठी आता बी- फॉर्म सक्तीचा; डाॅक्टरांची जबाबदारी वाढणार

तसेच यातून अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारला व त्यानुसार त्यापूर्वीही त्यांनी शहरात होर्डिंग्ज लावून होर्डिंगवर फक्त बाबासाहेब यांचे फोटो आणि सुविचारांची जयंती पेरली होती. त्यावेळेसही त्यांचे होर्डिंग शहरात चर्चेचा विषय ठरले होते. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळे तयार करुन ते आपल्या अनेक मित्रांना, सामाजीक संघटनांना देत असतात. 

यावर्षीही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही त्यांच्या विचारातून साजरी करावी. कारण सध्या संबंध जगभरात कोरोना संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून व त्यांनी दिलेल्या गाईडलाईनचे पालन करत कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत स्वखर्चाने शहरातील इच्छुक आॅटोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार लिहून सबंध शहरात हे ऑटो फिरत आहेत. यातून संग्रही असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार अनेकांच्या नजरेत आणि कानी पडत आहेत. त्यांच्या विधायक कामाची दखल समाज नक्कीच घेईल अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. अशा उपक्रमशील चित्रकारांकडून समाजानेही काही शिकावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.