
नांदेड : शहरातील सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे केंद्रस्थान ठरणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाचे नूतनीकरण, क्षमतावाढ, परिसर विकासाच्या कामाचे लोकार्पण रविवारी (ता. १३) झाले. अत्याधुनिक सुविधांनी सजलेले प्रेक्षागृह आता अधिक देखणे, सुसज्ज आणि बहुउपयोगी स्वरूपात नागरिकांसाठी खुले झाले.