esakal | शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

shivling

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०४ वर्षे) यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर (जि. लातूर) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०४ वर्षे) यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, गेल्या आठवड्यात शिवाचार्य महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवाही पसरली होती.  सोशल मिडियांवर महाराजांच्या व्हिडीओंनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी पाकीस्तानातील लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी मिळवली आहे. तसंच जिल्ह्यातील पहिले डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख आहे. महाराजांनी नांदेड शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील नांदेड रोडवर 14 एकर परिसरात 2007 मध्ये भक्तीस्थळाची स्थापना केली. या भक्तीस्थळावर महादेव मंदीर व प्रार्थना स्थळ असून तिथेच महाराजांचे वास्तव्य होते. भक्तीस्थळावर सामुहिक विवाहासाठी विनामूल्य जागा दिली जाते. 

अहमदपूर येथील मठासाठी राजशेखर विश्वंभर स्वामी तर हडोळतीच्या मठासाठी अभिषेक राजकुमार स्वामी यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलं होतं. हे दोघेही महाराजांचे भाऊ मन्मथअप्पा स्वामी यांचे नातू आहेत.