

Nanded
esakal
देगलूर: जलसाक्षरता, नदी पुनर्जीवन, लोकसहभागातून शाश्वत जलव्यवस्थापन आणि ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे देगलूरचे भूमिपुत्र डॉ. सुमंत नरसिंगराव पांडे यांची प्रतिष्ठेच्या 'वसंतराव नाईक जलसंवर्धन पुरस्कारासाठी' निवड झाली आहे. वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार (ता. १ जुलै) रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित विशेष समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख ३५ हजार रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.