

Nanded News
esakal
नांदेड: जनावरांचे दूध वाढविण्याचा दावा करून प्रमाणित दर्जा नसलेले उत्पादन पशुपालकांना विकल्याप्रकरणी सोनखेड पोलिसांनी संबंधित कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘दुधारू गोल्ड’ नावाच्या उत्पादनाच्या कॅनवर नमूद केलेल्या घटकांची मात्रा आणि प्रयोगशाळेतील तपासणीत आढळलेली मात्रा यामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे.