ग्राहक कायद्यातील सुधारित तरतुदीमुळे जिल्हा ग्राहक आयोगातील दावे वाढले- देवसरकर

file photo
file photo
Updated on

नांदेड :  ग्राहक संरक्षण कायदा- 2020 मधील सुधारीत तरतुदी करण्यात आल्याने जिल्हा ग्राहक आयोगात दाव्यांची संख्या वाढली असून या वाढीव दाव्यांचा निपटारा करण्यासाठी वाढीव इन्स्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असल्याचे मत जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर यांनी नुकत्याच झालेल्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील वेबिनार कार्यक्रमात व्यक्त केले.  

ग्राहक कायद्यातील वाढीव तरतुदींबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली. सदरील कायद्यात जिल्हा ग्राहक आयोगात एक कोटीपर्यंतचे दावे दाखल करण्याची तरतूद असल्यामुळे जिल्हा ग्राहक आयोगात दाव्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सदरील वाढीव दाव्यांचा निपटारा करण्यासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध झाले तरच सदरील वाढीव दाव्यांचा निपटारा होईल अन्यथा सदरील वाढीव दावे वेळेत निकाली काढणे शक्य होणार नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रा. डॉ. बा. दा. जोशी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा नांदेडचे संघटक, इंजि. बालाजी लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी, लतीफ पठाण यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर यांच्या हस्ते "ग्राहक पंचायत महाराष्ट्र, माहिती व कार्य दिशा" द्वितीय संस्करण, या पुस्तिकेचे, विमोचन संपन्न झाले.ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जिल्हा शाखा नांदेडचे संघटक, इंजि बालाजी लांडगे, यांनी जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी काँग्रेस सिनेट मध्ये 15 मार्च 1962 रोजी मांडलेले विचार उद्धृत केले.!

ग्राहक हा सर्वात मोठा आर्थिक गट आहे. 

तो खासगी तसेच सार्वजनिक आर्थिक निर्बंधावर परिणाम करतो. अर्थव्यवस्थेतील दोन तृतियांश भाग ग्राहक खर्च करतात. असे असूनही त्यांची मते ऐकली जात नाहीत. या भाषणाने ग्राहक जागृतीचे जगातील पहिले पाऊल पडले असे म्हणता येईल. यावेळी ग्राहक संरक्षण कायदा 1986, सदरील कायद्याचे सर्वसामान्य ग्राहकांना झालेले फायदे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा शाखा नांदेड तर्फे चालवल्या जाणाऱ्या ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राबाबतची माहिती व सदरील केंद्रात मार्फत सोडवल्या गेलेल्या तक्रारी यांची विस्तृत माहिती तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र, माहिती व कार्य दिशा या पुस्तिकेबद्दल माहिती दिली.
        

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com