
नायगाव : बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथे शनिवारी (ता. ३१) मध्यरात्रीनंतर आठ घरफोड्या झाल्याची घटना रविवारी (ता. एक) उघडकीस आली. एकाच रात्री आठ घरे फोडून जवळपास सहा तोळे २ ग्रॅम सोने आणि २८ तोळे चांदी, एक लाख २२ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे पोलिस सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण केले होते.