कोणाला निवडणुकीचं येड तर कोणाला पोट भरण्याचं कोड..

धोंडिबा बोरगावे
Wednesday, 13 January 2021

ग्रामपंचायत निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असतांना उमेदवारांसह समर्थक व पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत असून प्रत्येकजण मतदारांची मनधरणी करण्यात मश्गुल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

फुलवळ ( ता. कंधार, जिल्हा नांदेड ) : सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत निवडणूकची धामधूम चालू असून प्रचारात उमेदवार तर ओल्या पार्ट्यात मतदार गुंग असतांनाच दुसरीकडे दैनंदिन रोजीरोटीसाठी पोट हातावर असणाऱ्या आणि अशा निवडणुकांशी कसलेच देणेघेणे नसलेल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी मुलाबाळांची घामाघूम होत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असतांना उमेदवारांसह समर्थक व पॅनलप्रमुखांची चांगलीच दमछाक होत असून प्रत्येकजण मतदारांची मनधरणी करण्यात मश्गुल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आजपर्यंतच्या ग्रामपंचायत निवडणुकांपेक्षा यंदाची निवडणूक ही सर्वत्रच आगळी वेगळी ठरत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यावेळी बहुतांश ठिकाणी तरुणवर्ग या निवडणूक रिंगणात असल्याचे पहावयास मिळत असून सध्या डिजिटल चा जमाना असल्याकारणाने प्रचारही त्याच पद्धतीने डिजिटल आणि शोशल मिडियावरच जास्तीचा दिसून येतोय. 

हेही वाचाविधायक बातमी : भोकरमध्ये हुंडा न घेता लग्नसंबंध जोडून साखरपूडा उरकला

आणखी एक विशेष बाब म्हणजे कधीच ग्रामपंचायत निवडणुकीत डिजिटल बॅनर, पोस्टर न पाहिलेल्या गावागावात ही उमेदवारांचे मोठमोठे डिजिटल होर्डिंग्ज लावून गावातील चौक, मुख्य रस्ते रंगीबेरंगी केल्याचे दिसून येते. 

अशी ही निवडणुकीची धामधूम एकीकडे चालू असतांना अशा निवडणुकांचे कसलेच देणेघेणे नसलेल्या आणि स्वतः बरोबरच कुटुंबाच्या दैनंदिन उदरनिर्वाह साठी, पोटाची खळगी भरण्यासाठी घर- दार, गाव- शिवार सोडून मुलांबळासह या गावावरुन त्या गावाला आपलं पाल उचलत जनमानसांच मनोरंजन करण्यासाठी विविध गाणे, पोवाडे, भक्तिगीते म्हणून प्रेक्षकातून मिळेल ती मदत घेऊन दररोज चा दिवस कसा लोटेल यासाठी धडपड करणारे कुटुंब अनवाणी फिरताना दिसून येत असल्याने कोणाला निवडणुकीचं येड तर कोणाला पोट भरण्याचं कोड अशीच परिस्थिती पाहायला मिळत.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election code for someone and code to fill someone's stomach nanded news