
कॉँग्रेस सोडण्याचा निर्णय नाही : अशोक चव्हाण
नांदेड : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सोमवारी (ता. एक) त्यांनी नांदेडला प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यावर भाष्य केले. चर्चा कोण करतेय. या चर्चेला काही महत्त्व नाही. काँग्रेस सोडण्याचा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडणार, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. त्यापूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करताना अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार उशिरा पोचले. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेतेमंडळींनी देखील उशिरा पोहोचलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.
त्याचबरोबर राज्यात सत्ताबदल झाला असल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत असून अनेक नेतेमंडळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत देताना अशोक चव्हाण हे आता लवकरच भाजपमध्ये येणार आहेत, असे सांगितले होते.
मी काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा कोण करतेय? या चर्चेला काही महत्त्व नाही. मी भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
Web Title: Election News Ashok Chavan Statement I Am Not Leaving Congress Party Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..