भावी कारभारी गावकारभारात झाले मशगूल

grampanchyat.jpg
grampanchyat.jpg
Updated on


भोकर, (जि. नांदेड)ः तालुक्यातील एकूण ६३ ग्रामपंचायतीत आगामी काळात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषगांने ग्रामीण भागातील वातावरण गूलाबी बोचऱ्या थंडीत चांगलंच गरमागरम होतांना दिसत आहे. गावगाड्याचा ‘मूखीया’ होण्याचा बहूमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गावचा कारभारी निवडण्यासाठी भावी कारभारी गावातल्या ‘कारभारात’ मश्गूल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या समस्या आणि विकासाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी प्रारंभी गावात ‘मानकरी’ असायचा, पारावर बसून तो जो म्हणेल ती पुर्वदिशा असायची. हळूहळू लोकशाही मार्गाने गावात सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. ती आजपर्यंत तशीच कायम आहे. दरम्यान साध्या पध्दतीने निवडणुका पार पडत होत्या. काही धनदांडग्या लोकांनी या निवडणुकीत पैशाचे आमिष दाखवत ग्रामस्थांना मोहजाळात अडकून सिंहासनावर विराजमान होऊ लागले. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला तो पुन्हा मिळविण्यासाठी ग्रामसेवक आणि सदस्यांना विश्वासात घेऊन अनेक गैरव्यवहार करण्यास सुरवात झाली. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगू लागला. खेडोपाडी सरपंच पदाला चांगला मान मिळू लागला नव्हे तर आर्थीक लाभही होत असल्याने सर्वसामान्य माणूस या पदासाठी जिवाच रानं करायला तयार झाला. गावागावात गटातटाचे राजकारण सुरू झाले. 


अनुभवाच्या जोरावर पुढील दिशा 
कधी कधी वाद विकोपाला जाऊन अनेकांना जीव गमवावा लागला. आज प्रत्येक गावात ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. ग्रामिण भागातील विकासाची नाळ ही ग्रामपंचायतशी जोडल्या गेल्याने सरपंचपदाला महत्वप्राप्त झाले आहे. शासनाने ही ग्रामपंचायतीत होणाऱ्या एकमुखी निर्णय बैठकीस अधिकार प्राप्त करून दिले आहेत. पाच वर्षात आलेल्या अनुभवाच्या जोरावर पुढील दिशा ठरवीली जाणार आहे. गावागावात सध्या बैठावर बैठका सुरू झाल्या आहेत. पॅनल प्रमुख असलेल्या कारभाऱ्याला मात्र आता पासुनच खिशाला चाट बसत असून ‌मतदारांची मनधरणी करावी लागत आहे. 

मतदार कुणाचे? 
तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जरी राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी मात्र प्रत्येक गावात राजकीय ‘टच’ असतोच तसा भोकर तालुका हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असल्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिक सरपंच असावेत यासाठी पडद्यामागे राहून ‘खो’ देण्यासाठी येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना कामाला लावण्याची दाट शक्यता आहे. विरोधकही याच धर्तीवर त्यांची कामे आटोपून घेतील यात शंका नाही. येणाऱ्या काळात कोण अधिक जागा बळकावतील हे आतातरी स्पष्ट सांगता येत नाही. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com