अंत्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी धान्य घेतेवेळेस गर्दी टाळावी- जिल्हा प्रशासन

file photo
file photo

 नांदेड : कोविड-19 प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजना व  सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेंतर्गत जिल्ह्यातील अंत्‍योदय अन्‍न योजना आणि प्राधान्‍य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्‍यांना सप्‍टेंबर 2020 या महिन्यासाठी अन्‍नधान्‍याचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

राज्याच्या अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्‍या खरेदी धोरणानुसार विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत राज्‍यातील आधारभूत किंमत खेरदी योजनेंतर्गत खरेदी करण्‍यात आलेल्‍या भरड धान्‍याचे राज्‍यातच वाटप करावयाचा आहे. त्‍याअनुषंगाने ज्‍या जिल्‍हयातील ज्‍वारी आणि मका खरेदी करुन त्‍याच जिल्‍हयामध्‍ये गव्‍हाचे नियमन कमी करुन ज्वारी व मका हा अंत्‍योदय अन्‍न येाजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना वाटप करावे तसेच तसेच सदर भरड धान्‍य खराब होणार नाही या दृष्‍टीने सप्‍टेंबर 2020 पर्यंत भरडधान्याचे वाटप पुर्ण करावे अशा सुचना शासनाने दिल्या आहेत.

भरड धान्य ज्‍वारी व मका हा प्रति किलो रुपये एक प्रमाणे

त्याअनुसार नांदेड जिल्‍हयातील भरड धान्‍य असलेले गोदाम हे किनवट तालुक्‍यात असुन शासनाचे सुचनेनुसार किनवट पासुन वाहतुकीचे अंतर कमी असलेल्‍या किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, नांदेड, उमरी, धर्माबाद या तालुक्‍यातील  अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंबातील लाभार्थ्‍यांना वाटप करण्‍यासाठी सप्‍टेंबर 2020 करीता गव्‍हाचे नियमन कमी करुन ज्वारी व मका भरड धान्‍य मंजुर करण्‍यात आलेले आहे. भरड धान्य ज्‍वारी व मका हा प्रति किलो रुपये एक प्रमाणे वितरीत करण्‍यात येणार आहे.

नांदेड तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न येाजना योजनेतील लाभार्थ्‍यांना

सप्टेंबर 2020 करीता प्रतिमाह प्रति कार्ड ज्‍वारी 11 किलो, मका 7 किलो, गहू 5 किलो असे एकुण 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. तसेच किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद या तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न येाजनेतील लाभार्थ्‍यांसाठी प्रति कार्ड ज्‍वारी 11 किलो, मका 12 किलो, असे एकुण 23 किलो प्रतिकार्ड असुन तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्‍यातील अंत्‍योदय अन्‍न येाजनेतील लाभार्थ्‍यांसाठी प्रति कार्ड गहू 23 किलो, तांदुळ 12 किलो व साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे.  तसेच अंत्‍योदय योजनेतील नांदेड जिल्‍हयातील सर्व लाभार्थ्‍यांना प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्‍य 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्‍टेंबर 2020 या कालावधीतील मोफत चनाडाळ 3 किलो सप्‍टेंबर 2020 मध्‍ये वितरीत करण्‍यात येणार आहे.

प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील लाभार्थ्‍यांना सप्‍टेंबर 2020 मध्‍ये

नांदेड, किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, अर्धापुर, मुदखेड, उमरी, धर्माबाद या तालुक्‍यातील लाभार्थ्‍यांसाठी प्रति सदस्‍य मका 3 किलो, तांदुळ 2 किलो व प्रति कार्ड साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. कंधार, लोहा, देगलुर, बिलोली, नायगाव, मुखेड या तालुक्‍यातील प्रति सदस्‍य गहू 3 किलो, तांदुळ 2 किलो व प्रति कार्ड साखर 1 किलो वितरीत करण्‍यात येणार आहे. तसेच या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेंतर्गत मोफत प्रतिमाह प्रति सदस्‍य 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ व जुलै ते सप्‍टेंबर 2020 हया कालावधीतील मोफत चनाडाळ 3 किलो ही सप्‍टेंबर 2020 मध्ये वितरीत करण्‍यात येणार आहे. 

या धान्‍याचे वाटप PoS मशीनमार्फत होणार आहे.

साधारणतः प्रत्‍येक महिन्याच्या पहिल्‍या पंधरवडयामध्‍ये विहीत दराने (ज्‍वारी व मका 1 रु किलो, गहू 2 रु.किलो, तांदुळ 3 रु.किलो) वाटप झाल्‍यानंतर दुसऱ्या पंधरवडयामध्‍ये मोफत धान्‍याचे वितरण होणार आहे. याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्‍हयातील सर्व स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना वरीलप्रमाणे जिल्‍हयातील पात्र लाभार्थ्‍यांना धान्‍य वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात आलेल्‍या आहेत, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com