विकासकामांमुळे अपघात होऊ देऊ नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Emergency Management Meeting at Nanded Municipal Corporation

विकासकामांमुळे अपघात होऊ देऊ नका

नांदेड - शहर व परिसरात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे आणि सुरू असलेल्या कामांमुळे अपघात होऊ नये, यासाठी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महापौर जयश्री निलेश पावडे यांनी मंगळवारी (ता. १२) दिल्या.

नांदेड वाघाळा महापालिकेत महापौर पावडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अब्दुल गफार, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, गिरीश कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्यासह महापालिकेतील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. शहराचा कायापालट करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे सुरू आहेत.

शहरातील रस्त्यांची कामे सुरू असून अनेक भागात ही कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, ज्या भागात रस्त्याची कामे सुरू आहेत अशा भागात एक पदरी रस्ता सध्या वाहतुकीसाठी खुला आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याचे काम सुरू आहे किंवा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, अशा प्रकारचे सूचनाफलक लावावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बॅरिकेट उभारून रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करावा. ज्यामुळे रात्री आणि पावसाच्या वेळेत अपघात होणार नाहीत. नागरिकांच्या जीविताला धोका होणार नाही, यासाठी काळजी घेतली जावी, अशा सूचना महापौर जयश्री पावडे यांनी दिल्या. यासोबतच शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाऊस उघडल्यानंतर तातडीने खड्डे बुजविण्याचे अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही महापौर पावडे यांनी दिल्या.

Web Title: Emergency Management Meeting At Nanded Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..