अनेकांना रोजगार : कंधार, लोहाच्या सिताफळाचा गोडवा राज्यभर प्रसिध्द 

प्रल्हाद कांबळे
Friday, 23 October 2020

यंदा पावसाने घातलेले थैमान आणि परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक वाया गेले. मात्र कंधारच्या सीताफळाला बाजारात यंदा रानमेवा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. यामुळे कंधार, लोहा, हदगाव या तालुक्यातील सिताफळाला राज्यातील बाजारपेठेत सर्वाधिक पसंती आहे.

नांदेड : जिल्ह्यातील कंधार, मुखेड, लोहा, हदगाव या तालुक्यात जंगलसदृश्‍य भाग जास्त असल्याने माळरानावर सिताफळांची झाडे व झुडूपे मोठ्या प्रमाणात आहेत. यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने जंगलातील सर्वच वनस्पतीने आपला मेवा खव्वयाना दिला. यात सिताफळही मागे नाही. चवीला गोड व राज्यभरात मागणी असणारे कंधार, लोहा, हदगाव तालुक्यातील सिताफळ आता बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांची गर्दी झाली आहे. या सिताफळाला राज्यातील बाजारपेठेत सर्वाधीक पसंती आहे.

यंदा पावसाने घातलेले थैमान आणि परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक वाया गेले. मात्र कंधारच्या सीताफळाला बाजारात यंदा रानमेवा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. यामुळे कंधार, लोहा, हदगाव या तालुक्यातील सिताफळाला राज्यातील बाजारपेठेत सर्वाधिक पसंती आहे. या रानमेव्याकडे बघताच ग्राहक आकर्षित होत आहेत. या भागातून अनेकांना रोज ये- जा करावी लागते. सिताफळांनी बाजार फुलून जात आहे. एका सीताफळाचे वजन जवळपास पाव किलो पेक्षा जास्त आहे. सिताफळ माळरानावर नैसर्गिक वातावरणातील हवामानावर येतो. पण या वर्षी हा हंगाम मात्र येथील परिसरात मोठ्या प्रमाणात बहरला आहे. दिसायला मोठा असल्याकारणाने ग्राहक सिताफळाकडे बघून आकर्षित होत आहे. या भागातील हा मेवा चवीला गोड असल्याने याची ग्राहकांकडून मागणी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिसरात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे परतीच्या पावसामुळे संपूर्ण नुकसान झाले आहे. शेतातील ज्वारी, सोयाबीन, कापूस परतीच्या पावसामुळे हातचा गेला. तरी परिसरात रानमेवा मोठ्या प्रमाणात मिळतो आहे. या सीताफळाचे प्रमाण कंधार तालुक्यातील परिसरातील डोंगराळभागावर वसलेला असून या परिसरात अनेक रानमेव्याची लागवड आहे. तेथून संपूर्ण राज्यात हा रानमेवा बाजारपेठेत पाठवला जातो.

हेही वाचा -  राष्ट्रवादी काॅंग्रेस : ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग, पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय -

जिल्ह्यातील या भागात सिताफळाचे सर्वाधीक उत्पन्न

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कंधारचा रानमेवा (सिताफळ) प्रसिद्ध आहे. माळाकोळी, माळेगाव, तामसा, लहान, लोहा, सोनखेड, पोलिसवाडी, घोडज, पानभोसी, संगुचीवाडी, अंबुलगा, शिराढोण, गोलेगाव, मुखेड फ़ाटा, किरोडा, फुलवळ, गऊळ, हरबळ, हारबळ, शेल्लाळी, आंबुलगा, कंधारेवाडी, पानशेवडी, बाचोटी, शेकापूर, नागलगाव, कुरुळा या भागातील शिवारात सिताफळ आढळून येतात. विशेष या रानमेव्याची लागवड करायची गरज नाही. निसर्ग लाजवेल अशा प्रकारे सध्या माळरानावर झुडपेच्या झुडपे व लागलेली गोड फळे फुलून दिसत आहे. या परिसरात बिनलागवडीचा व्यवसाय असून शिवारातच ही फळे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जातात. अन् बाजारात विक्रीसाठी आणले जातात. परिसरातील कुटुंब दररोज पहाटे शिवारातून शहरात येतात आणि विक्रीसाठी सकाळी बाजारात आणतात. मिळालेल्या पैशात आपला उदरनिर्वाह चालवतात. हा रानमेवा खाण्यास चवदार असल्यामुळे मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे.   

येथे क्लिक करालोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई : सचखंड एक्सप्रेसमधून 29 लाखाचा गुटखा जप्त -

परराज्यातही सिताफळाला मागणी

कंधार व लोहा तालुक्यात म्हणावी तशी शेती नसून सुपीक जमीन नाही. येथील हा रानमेवा मोठ्याप्रमात असून शेकडो कुटुंबासाठी उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. रानमेवा अनेक जिल्ह्यातुन व्यापारी ट्रकच्या ट्रक भरून इतर राज्यात विक्रीसाठी पाठवला जात होता. या वर्षी देशात लाकडाऊन, टाळेबंदी व कोरोनाच्या भितीपोटी हा रानमेवा पोहचू शकला नाही. अनेक छोट्या- मोठ्या शहरासह इतर राज्यात हा किलोने व नगावरही विकला जात होता. शेजारील लातूर, हिंगोली, परभणी, नागपूर, मुंबई, पुणे या जिल्ह्यासह तेलंगना, कर्नाटक, आंध्रप्रेदश या राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची व्यापारी सांगतात.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment for many: Kandhar, loha's sweet fruit is famous all over the state nanded news