
नांदेड : ऊर्जेची बचत हेच ऊर्जेचे संवर्धन
नांदेड : सूर्य (Sun) हा उर्जेचा (Energy) अपारंपरिक स्रोत आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन मानवाने उर्जेची निर्मिती केली आहे. त्यामुळे उर्जेची बचत हेच उर्जेचे संवर्धन होय, असे मत साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी व्यक्त केले.
जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राष्ट्रीय उर्जा संवर्धन (National Energy Conservation) सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयात उर्जा संवर्धन सप्ताह २० डिसेंबरपर्यंत साजरा करण्यात येत आहे. संतोष अंबुलगेकर यांच्या कल्पकतेतून उर्जेची बचत आणि संवर्धन हे विषय देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
हेही वाचा: नांदेड : ‘पाणी वाचवा’ उपक्रमाला हरताळ...
श्री. ढवळे म्हणाले की, ऊर्जा संवर्धनाचा प्रचार आणि प्रसार करून "राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे महत्व विविध घटकांना पटवून देणे हा या उपक्रमाचा भाग आहे. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे जात असताना ऊर्जेचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी विद्यार्थ्यांना उर्जा बचत व संवर्धनाची शपथ देण्यात आली.
या सूचनांचे पालन करावे
उर्जा संवर्धनाकरिता दैनंदिन जीवनात काय करणे शक्य आहे, याबाबत काही सूचना यावेळी देण्यात आल्या. गरज नसेल तेंव्हा विद्युत उपकरणे आणि दिवे बंद करणे. वापरात नसेल तेंव्हा विद्युत उपकरणांचे मेन स्वीच बंद ठेवणे. कार्यालयात व घरात सुर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे. घरातील आतील भिंतींना व छताला फिक्कट रंग देणे. फ्रिजमध्ये जास्त बर्फ साचु न देणे. वीजेच्या अती उच्च मागणी काळात म्हणजेच सकाळी सात ते ११ व सायंकाळी सहा ते १० या वेळेत मोठ्या प्रमाणावर वीज उपकरणांचा वापर टाळावा, आदी दैनंदिन जीवनातील ऊर्जा बचतीच्या सुचना विद्यार्थ्यांना दिल्या.
Web Title: Energy Saving Is The Conservation Of Energy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..