esakal | पब्लिक क्राय ः विनापरीक्षा पासच्या निर्णयाला इंग्रजी शाळांचा विरोध 

बोलून बातमी शोधा

File photo

शालेय शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय चुकीचा आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार? असा प्रश्न आहे. 

पब्लिक क्राय ः विनापरीक्षा पासच्या निर्णयाला इंग्रजी शाळांचा विरोध 
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. असे असले तरी खासगी इंग्रजी शाळांनी त्याला विरोध केला आहे. वर्षभर वर्गांना उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घेणार नाही, असा निर्धार केला आहे. 

कोरोना व लॉकडाउनमुळे गेले वर्षभर शाळा बंद राहिल्या. या काळात आॅनलाईन वर्ग सुरु राहिले. डिसेंबरनंतर टप्प्याटप्प्याने वर्गही सुरु झाले. पण अनेक विद्यार्थी आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही वर्गांना अनुपस्थित राहिले. त्यांना वरच्या वर्गात प्रवेश देणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड करण्यासारखे आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान होणार आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा आॅनलाईन स्वरूपात घेण्याची तयारी असताना परीक्षा न घेण्याचा शिक्षणमंत्र्यांचा निर्णय दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे सलग दुसऱ्या वर्षी मुलांचे मूल्यमापन होणार नाही. परिणामी, हुशार मुलांचे मोठे नुकसान होणार आहे. 

हेही वाचा - साहेब ! वेळेचा निर्बंध लावा परंतु लाॅकडाउन नको; व्यापाऱ्यांचे उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर साकडे

कोरोनाच्या नावाखाली शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान शासन करत आहे. परिणामी शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चुकीचा पायंडा पडत आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत १० ते १५ टक्के विद्यार्थी संपूर्ण वर्षभर गैरहजर आहेत. त्यांना पुढील वर्गात प्रवेश न देणे योग्य नाही. त्यांच्याकडून कोणतेही वेगळे किंवा अतिरिक्त शुल्क न घेता त्यांना यावर्षीदेखील त्याच वर्गात प्रवेश दिला जाईल. खुद्द अनेक पालक देखील आपल्या मुलाला पुन्हा जुन्याच वर्गात बसविण्याची विनंती देखील करत आहेत. 

 निर्णयाचा फेरविचार व्हावा  
कोरोना लॉकडाउनमुळे आॅनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे परीक्षागी आॅनलाइन स्वरूपात घेता आल्या असत्या. श्रेणीनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शक्य होते. तरीही शिक्षणमंत्र्यांनी परीक्षा रद्दचा अनाकलनीय निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी वरच्या वर्गात जाणार असला तरी त्याची बौद्धीक क्षमता स्पष्ट होणार नाही. त्यामुळे निर्णय मागे घ्यावा. 
- सुवर्णा कुलकर्णी (शिक्षिका) 
 
आॅनलाइन परीक्षा घ्याव्यात 
गेली वर्षभर शाळा बंद असल्यातरी मुलांना आॅनलाइन शिक्षण दिले. त्यामुळे त्यांची परीक्षाही आॅनलाईन पद्धतीने घेणे अनिवार्य असल्याने परीक्षा रद्दच्या निर्णयाचा फेरविचार करून आॅनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी खासगी शाळांसह पालकांचीही मागणी आहे. 
- रश्मी वसंतराव जोशी (शिक्षिका) 

नांदेड जिल्ह्यातील इतरही बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा