esakal | उद्योजकाने घरातच बांधली रेशीमगाठ... 
sakal

बोलून बातमी शोधा

vivah

नांदेडातील युवा उद्योजक लक्ष्मीकांत उत्तरवार यांनी ‘कोरोना’च्या समस्येवर उपाय शोधत भलेमोठे कुटूंब व नातेवाईकांचा गोतावळा असतानाही कुठलाही बडेजाव न करता मोजक्या नातेवाईकांसह घरातच लग्न सोहळा करुन सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर उत्तरवार यांचा विवाह सोहळा साधेपणाने घरातच पार पडला.  

उद्योजकाने घरातच बांधली रेशीमगाठ... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : टाळेबंदीमुळे अनेकांचे लग्न सोहळे रखडले आहेत. त्यामुळे वधू-वरांची चांगलीच पंचाईत झाली असून नांदेडातील युवा उद्योजक लक्ष्मीकांत उत्तरवार यांनी या समस्येवर उपाय शोधत भलेमोठे कुटूंब व नातेवाईकांचा गोतावळा असतानाही कुठलाही बडेजाव न करता मोजक्या नातेवाईकांसह घरातच लग्न सोहळा करुन सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले.

नांदेडच्या गुरूजी चौक परिसरातील श्री रेफ्रिजरेशनचे संचालक लक्ष्मीकांत उत्तरवार व मुळचे लोहा येथील पण नांदेडमध्ये राहणाऱ्या रहाटकर कुंटूंबियांची कन्या संजिवनी यांचे लग्न मागील सहा महिन्याअगोदर ठरले होते. मात्र, अचानक टाळेबंदी सुरू झाल्यामुळे हे लग्न रखडले. 

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी टीप्स : उन्हाळ्यात कशी घ्याल पीकांची काळजी

सामाजिक नियमांचे केले पालन
टाळेबंदी वाढतच राहिल्याने लग्न कधी करायचे, हा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी घरच्या घरीच लग्न उरकण्याचा निर्णय घेतला. हे करताना ‘कोरोना’चा धोका टाळण्यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. या वधू-वरांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने आपल्या घरातच मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पाडला. सोहळ्यासाठी मुलाचे वडील, मावशी, काका, ताई- भावजी व इतर एक-दोन नातेवाईक उपस्थित होते. या वेळी तोंडाला मास्क बांधून, हातमोजे, सॅनिटायझर वापरून सामाजिक नियमांचे पालन करूनच सर्व जण या सोहळ्यात सहभागी झाले होते.

हेही वाचा - नांदेड : दहा दिवसावर आलेल्या लग्नघरचा काका- पुतन्या अपघातात ठार -

मोजक्याच नातेवाईकांची उपस्थिती 
विवाह सोहळ्याचे सर्व विधी घरच्या घरीच करण्यात आले व या विवाहासाठी संत पाचलेगांवकर मठाचे श्री ऋषीकेश महाराज रत्नपारखी गुरू यांनीही ‘कोरोना’मय वातावरणात आवश्‍यक ती काळजी घेण्याच्या सूचना वधू-वर या दोन्ही पक्षांना देत हा विवाह अगदी साधेपणाने पार पाडला. उपस्थित मोजक्याच नातेवाईकांनी तोंडावर मास्क बांधून विधी पार पाडत लक्ष्मीकांत व संजिवनी हे दोघेही विवाह बंधनात अडकले. 

कुटुंबातील सदस्यांची सहमती
या वधू-वरांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने आपल्या घरातच मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पाडला. सोहळ्यासाठी मुलाचे वडील, मावशी, काका, ताई- भावजी व इतर एक-दोन नातेवाईक उपस्थित होते. त्या सर्वांनी ‘कोरोना’मुळे शासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन केले.

loading image