esakal | नांदेडात आजही कोरोनाने घेतला दोघांचा बळी, एक पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

तीन रुग्णास श्वासनाचा त्रास, मधुमेह, उच्चरक्तदाब असे गंभीर आजार असल्याचे सांगितले जात होते. या रुग्णांपैकीच शहरातील वाघी रोड परिसरातील बरकतपुरा येथील ५५ वर्षीय महिलेचा तर उमरखेड येथील ७४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा रुग्णालयात शुक्रवारी (ता.१२ जून) उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

नांदेडात आजही कोरोनाने घेतला दोघांचा बळी, एक पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : शुक्रवारी (ता.१२ जून) सकाळी आठ वाजता दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असतानाच दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी दोन बळी गेले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा दोघांचा मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी दिवसभरात २१ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली होती. त्यातील तीन रुग्णास श्वासनाचा त्रास, मधुमेह, उच्चरक्तदाब असे गंभीर आजार असल्याचे सांगितले जात होते. या रुग्णांपैकीच शहरातील वाघी रोड परिसरातील बरकतपुरा येथील ५५ वर्षीय महिलेचा तर उमरखेड येथील ७४ वर्षीय पुरुष अशा दोघांचा रुग्णालयात शुक्रवारी (ता.१२ जून) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांवर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. 

हेही वाचा- Corona Breaking ; नांदेडात गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वोच्च नोंद ​

मृत्यू संख्या १३ वर

गुरुवारी (ता.११ जून) संध्याकाळी ६२ स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील काही स्वॅब अहवाल शुक्रवारी (ता.१२ जून) सकाळी प्राप्त झाला असून, यात पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२५ इतकी झाली आहे. तर उपचारा दरम्यान दोघांच्या मृत्यू झाल्याने रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.    

हेही वाचा- पोलिसांसह आरोग्य विभागाचीही होतेय दमछाक, कशामुळे? ते वाचाच

गुरुवारी अशी वाढली रुग्ण संख्या

गुरुवारी पंजाब भवन यात्रीनिवास येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत बरकतपुरा भागातील ५५ वर्षीय महिला, फरांदेनगरातील ५२ वर्षीय पुरुष, खाजा कॉलनीतील ६७ वर्षीय पुरुष, उमर कॉलनीतील १६ वर्षीय युवक, इतवारा भागातील पाच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चार पुरुषांचा समावेश असून, त्यांचे वय १६, २६, २८ आणि ६२ वय, तर ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर गुलजार बागेतील आठ व्यक्तींपैकी तीन पुरुष ज्यांचे वय ३५, ४१ आणि ३८, तर पाच महिलांमध्ये तीन आणि दहा वर्षांच्या दोन मुलींचा समावेश, तर तीन महिला ज्यांचे वय २८, ३० आणि ३८ असे आहे. याशिवाय मुखेड शहरातील होळकरनगर व विठ्ठलनगर परिसरातील एक, अशा दोन ४५ आणि ५५ वर्षीय पुरुषांचा यात समावेश आहे. 

नांदेडकरांनी दक्षता बाळगावी
लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली असली तरी, नागरिकांनी अत्यावश्‍यक असेलतरच बाहेर पडावे. कारण, कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे नांदेडकरांनी खबरदारी घेवून दक्षता बाळगावी.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड