बारड महसूल मंडळात अतिवृष्टीजन्य परिस्थिती

एका दिवसात १३५ मिमी पावसाची नोंद; तिबार पेरणीचे संकट
Excessive rainfall conditions in Barad Revenue Board Nanded
Excessive rainfall conditions in Barad Revenue Board Nanded

बारड - येथील महसूल मंडळांतर्गत दोन दिवसाच्या सतत पावसामुळे अतिवृष्टीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एका दिवसात १३५ मीमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून हजारो एकर जमीन पाण्याखाली आल्याने त्रिवार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले असून शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचले असून शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेले आहेत. या वेळी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीस शेतकऱ्यांनी कोरड्यावर पेरण्या करून घेतल्याने पावसाच्या दडीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मध्यंतरी अचानक पाऊस झाल्याने केलेली पेरणी थोपल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. परंतु आता पाण्याने हाहाकार उडाल्याने नदी नारे तुडुंब भरून वाहत असून शेताला वेडा दिल्याने तलावाचे स्वरूप धारण केले आहे.

खरीप पेरणी पिके पाण्याखाली सापडल्याने आता शेतकऱ्यासमोर तिसऱ्यांद्या पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टी पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आल्याने नदीकाठची शेती खरडून गेली असल्याने पिके पूर्णतः वाहून गेले आहे. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत पाणी निचऱ्याचे नियोजन केले नसल्याने आंबेगाव पाटी लागत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रगतशील शेतकरी नवनाथ कोंडीबाराव देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतीचा प्रयोग यशस्वी करीत असतात. विशेष म्हणजे स्वनिर्मित शेतातील पिकांची विक्री स्वतः करतात. यानंतर अभियंता भुजंग नवनाथ देशमुख यांनी शेती व्यवसाय निवड करून वडिलांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. यानंतर रोपवाटिकेच्या माध्यमातून नवनवीन रोपांची देखभाल सुरू केली होती. अल्पभूधारक शेतकरी नवनाथ देशमुख, विनायक देशमुख यांच्याही रोपवाटिकेत पाणी साचल्याने रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाई देण्याची मागणी

महसूल मंडळ अंतर्गत मुदखेड तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली असेल्याने पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून अतिवृष्टीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना दोन वेळी पेरणी केल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना त्रिवार पेरणीचे आव्हान उरलेले नाही. अशा परिस्थितीत तिबार पेरणीचे संकट उभे राहिले असून खरीप पेरणीची वेळ निघून गेली असल्याने काय करावे असा प्रश्न भेडसावणारा आहे.

मुदखेड तालुक्यातील केळीचे माहेरघर म्हणून बारडची ओळख आहे; परंतु गेल्या दोन वर्षात केळीचे भाव कोलमडल्याने लागवडीचा खर्चही निघाला नाही. अतिवृष्टीचा आढावा घेऊन तहसील प्रशासनाने तातडीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com