

Nanded News
esakal
नांदेड: एप्रिलच्या अखेरीस रविवारी शहरात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २६ अंशांवर नोंदविण्यात आले. सकाळपासूनच जाणवणारी उकाड्याची तीव्रता दुपारपर्यंत प्रचंड वाढली आणि शहर अक्षरशः तापून निघाले. उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होत्या की, दुपारच्या सुमारास मुख्य रस्तेही ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.