शेतकऱ्याचं पोर कमावतो महिण्याला लाखो रुपये, कसे? ते वाचाच

शिवचरण वावळे
Saturday, 8 August 2020

सहा महिण्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील एका लॉन्ड्रीचालकाकडे सव्वा महिण्याचे प्रशिक्षण घेतले.  तीन ते चार लाख रुपये गुंतवणूक करुन  कपडे धुण्याचे अत्याधुनिक यंत्र खरेदी करुन व्यवसायाची सुरुवात केली. कालांतराने चक्क ४० लाखापर्यंत गुंतवणूक करून व्यवसायात तर जम बसवलाच, २० युवकांना रोजगारही मिळाला. 
 

नांदेड : आज मुलगा शिकला की त्याला देश- विदेशातील कंपनीचे लाखो रुपये पॅकेजच्या नोकरीची आॅफर येते. परंतु अनेकजण मात्र अशा आॅफर धुडकावून लावत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. त्यातीलच एक आहे शेतकरी पुत्र भगवान पावडे. यांनी बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण करुन वडिलोपार्जित शेती सुरु केली आणि शेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा, कुक्कुट पालनाचा व्यवसाय न करता ड्रायक्लिनचा व्यवसाय सुरु केला. 

सुरुवातीस ग्राहकाकडून आणलेले कपडे धोब्याकडून धुवून घेऊन त्या कपड्यांना इस्त्री करुन ते ग्राहकांपर्यंत पोहचती केले जात असे. सहा महिण्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील एका लॉन्ड्रीचालकाकडे सव्वा महिण्याचे प्रशिक्षण घेतले.  तीन ते चार लाख रुपये गुंतवणूक करुन  कपडे धुण्याचे अत्याधुनिक यंत्र खरेदी करुन व्यवसायाची सुरुवात केली. कालांतराने चक्क ४० लाखापर्यंत गुंतवणूक करून व्यवसायात तर जम बसवलाच, २० युवकांना रोजगारही मिळाला. 
 
हेही वाचा-Video- नांदेड :महसूल भवन कर्मचारी निवासस्थानातील बाधीतांकडे दुर्लक्ष ​

व्यवसायात सातत्यासाठी ॲप डेव्हलप

सध्या त्याने शहरात चार ठिकाणी शाखा सुरु केल्या असून, १५ हजार ग्राहकांशी त्यांचा थेट संपर्क आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक कपडे येतात. यातून महिण्याला चार लाखापर्यंत कमाई होते. गत पाच महिण्यापासून लॉकडाउन असला तरी, व्यवसायात सातत्य ठेवण्यासाठी भगवान पावडे याने काही दिवसांपूर्वी सुगंधा ड्रायक्लिनर्स नावाने स्वतःचा ॲप डेव्हलप केला आहे.  

हेही वाचा- नांदेड : सलग दोन वेळा एकच दुकान फोडणारा चोरटा कोठडीत

शहरात चार ड्रायक्लिनच्या शाखा 

अगदी कमीत कमी भांडवलात देखील ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून व्यवसाय सुरु करता येऊ शकतो आणि यातुन इतरांच्या हाताला देखील रोजगार मिळवून देता येऊ शकतो. हा आत्मविश्वास जागवला आहे. हळुहळु हा व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले आणि शहरात चार ड्रायक्लिन सेंटर सुरु केले. यातून चांगली मिळकत होत असल्याने त्यांनी २० ते २५ जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.  मागील पाच महिण्यापासून जिल्ह्यात लॉकडाउन असले तरी, एकाचीही नोकरी गेली नाही किंवा त्यांना कामावरुन कमी केलेले नाही, असे भगवान पावडे अभिमानाने सांगतो. 

अण्णा भाऊ साठे  जन्मशताब्दी निमित्ताने नव्याने ड्रायक्लिनची शाखा

लॉकडाउन काळात देखील लोकांना सेवा देता यावी यासाठी सुगंधा ड्रायक्लिनच्या नावाने स्वतःचा ॲप डेव्हलप केला आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडलो आहे. एकीकडे सर्व उद्योग-व्यवसाय, प्रतिष्ठाने बंद असतानाही अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने शहरात नव्याने ड्रायक्लिनची शाखा सुरु केली आहे.  
- भगवान पावडे, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Farmer Earns Millions Of Rupees A Month How Just Read It Nanded News