शेतकऱ्यांना मिळाले हक्काचे मका खरेदी केंद्र- हेमंत पाटील

शेतकऱ्यांच्या हितासाठी किनवट तालुक्यातील चिखली येथे महाराष्ट्रातील एकमेव मका खरेदी सुरु करुन शेतकऱ्यांना हक्काचे खरेदी केंद्र मिळवून दिले आहे.
हेमंत पाटील
हेमंत पाटील

नांदेड/ हिंगोली : शेतकऱ्यांच्या हितासाठी किनवट तालुक्यातील चिखली येथे महाराष्ट्रातील एकमेव मका खरेदी सुरु करुन शेतकऱ्यांना हक्काचे खरेदी केंद्र मिळवून दिले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंद व्यक्त केला जात असून शेतकऱ्यांची जाण असलेल्या खासदारांवर शेतकरी वर्गातून विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. येणाऱ्या काळात लोकसभा कार्यक्षेत्रात विविध शेतमालाचे खरेदी केंद्र उभे करुन जगाच्या पोशिंद्यास न्याय मिळवून देण्याची भावना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.

आगामी काळ हा लागवडीचा असून बी- बियाणेकरिता शासन दरबारी सातत्याने प्रयन्त करत असल्याचे सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले.आज आपल्या सर्वांवर कोरोनाची भयावय परिस्थिती असूनसुद्धा माझा शेतकरी राजा जीवाचे रान करत, संकटाना मात देत कुठल्याही वादळाची तमा न बाळगता कार्य करत आहे. अश्या परिस्थितीमध्ये मी आपल्या सोबत कायम असून यापुढेही असल्याचे स्पष्ट केले. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी हक्काचे स्थान मिळवण्यासाठी यापूर्वीच केंद्रीय मंत्रालयात पाठपुरावा केला असून तेही आपल्या सेवेत लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा -

किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेची लोकार्पण केल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी तालुक्यातील चिखली येथील मका, खरेदी केंद्राचे उदघाटन केले आणि खरेदीला सुरवात झाली. यावेळी खासदार हेमंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते. किनवट हा आदिवासी तालुका असल्याने महाराष्ट्र शासन निर्णयानुसार राज्यातील आदिवासी क्षेत्रामधील भरड धान्य खरेदी करण्याकरिता त्याच भागात खरेदी केंद्र निश्चित करण्यात येत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदार संघातील आदिवासी बहुल किनवट तालुक्यातील केंद्रांना मंजुरी मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होत होती. याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्रव्यवहार केल्यांनतर किनवट तालुक्यातील जलधारा आणि चिखली येथील खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे. याकरिता राज्य शासनाने नेमणूक केलेल्या अभिकर्ता संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या वतीने प्रादेशिक व्यवस्थापक, तसेच प्रादेशिक कार्यालय यवतमाळ यांनी प्रस्तावित केल्याप्रामणे या खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार चिखली येथील केंद्राचे उदघाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या मका ८०० रुपये दराने खरेदी करीत असताना शासनाच्या खरेदी केंद्रांवर एक हजार ८७० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी होत आहे. भविष्यातही आपण शेतकरी हिताला प्राधान्य देऊ असे सांगून सध्या वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट होत आहे. तेव्हा शिवारात कामे करताना शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील बोधडी इस्लापूर भागातील विविध भागांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच पुजार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, तहसीलदार उत्तम कागणे, तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, मारोती दिवसे, गजानन बच्चेवार, मारोती सुंकलवाड, सुरज सातुरवार, संतोष यलचलवार, प्रादेशिक व्यवस्थापक सुरेश अंबाडकर, ग्रेडर वैशाली होले, सरपंच भाग्यश्री खुपसे,शंकर फोले, माधव वाळके, भाऊराव गायकवाड, नारायण दराडे आदींची उपस्थिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com