Monsoon Update: मारतळा परिसरात २२ दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर दमदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
Indian Farmers: मारतळा आणि परिसरात २२ दिवसांच्या सूक्याच्या काळानंतर शुक्रवारी (ता. १८) दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पिकांना नवा जीवनदान मिळाले आहे.
मारतळा : मारतळ्यासह परिसरात पावसाच्या दीर्घ उघडिपीने पिके माना टाकत होती. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. मात्र, तब्बल २२ दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर शुक्रवारी दुपारी एक ते तीन दरम्यान परिसरात दमदार पाऊस झाला.