
नांदेड : गेल्या आठवडाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काही भागांत जोरदार पाऊस झाला असला, तरी मागील सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या स्थितीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ ते १६ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे आहेत.