Farmer News : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर; बियाण्यांच्या दरात २५६ रुपयांनी वाढ

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : ऐन पेरणीच्या तोंडावर कोसळले संकट
Farmer seed price
Farmer seed pricesakal

नांदेड : कपाशीच्या दरात शासनाने वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. बियाण्यांच्या दरात ८६ ते २४६ रुपयांची वाढ झाली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बियाण्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे याबाबत तत्काळ संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग तिसऱ्या वर्षी कापसाच्या बीजी - दोन बियाणे दरांत वाढ केली आहे. यावर्षी प्रतिपाकीट (४५० ग्राम) ४३ रुपयांची वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कपाशीच्या साध्या लागवडीसाठी एकरी ८६ रुपये, तर अदिघन लागवडीसाठी २५६ रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. सध्या देशात उपलब्ध असलेले बीजी - दोन बियाणे गुलाबी बोंडअळी प्रतिबंधक राहिले नसल्याने ते कालबाह्य झाल्याची माहिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली असून, या बियाण्यांचे दर कमी असायला हवेत, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Farmer seed price
Nanded Fraud : लाख रोख उकळले : गुन्हा दाखल होताच खंडणीबहाद्दर अटकेत

अलीकडे कापसाचे उत्पादन सातत्याने घटत असल्याने केंद्र सरकारने काही अटींवर एचटीबीटी वाणाच्या चाचण्यांना परवानगी दिल्याने दोन ते तीन वर्षात नवीन बियाणे बाजारात येईल. बीजी - दोन बियाणे कमी दरात विकून त्याचा साठा कमी करणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. आधी कंपन्यांनी रॉयल्टीच्या नावावर शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेतले. तर आता केंद्र सरकार पैसे वसूल करीत आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेत्यांनी यांनी केला.

गुलाबी बोंडअळीची बीजी - दोन बियाण्यांतील जनुके प्रतिकारशक्ती वाढल्याने सध्याचे बीजी - दोन बियाणे गुलाबी बोंडअळीला प्रतिबंधक राहिले नाही. केंद्र सरकारने अपर्गेट बियाणे उपलब्ध करून दिल्यास ते शेतकरी अधिक दर देऊन खरेदी करतील.

- वामनराव गोराडे पाटील, शेतकरी.

Farmer seed price
Nanded : पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ; ‘सीबीएसई’ला पसंती : डोनेशनमुळे अनेकांचा हिरमोड

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे दर कमी झाले आहेत. बियाण्यांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यामुळे देशातील कापसाचा पेरा कमी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

- साहेबराव घुगे, शेतकरी.

असे वाढत गेले बीजी -दोन बियाण्यांचे दर

हंगाम ----- दरवाढ (प्रतिपाकीट - रुपयांत)

२०१८-१९ - ७४०

२०२९-२० - ७३०

२०२०-२१ -७३०

२०२१-२२- ७६७

२०२२-२३ -८१०

२०२३-२४ -८५३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com