
नांदेड : शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, शहरात प्लॅस्टिक ताडपत्री अच्छादन खरेदी करण्यासाठी नागरिक, शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अनेकांच्या घरांवरील जुने पत्रे फुटल्याने घरात पावसामुळे पाण्याची गळती लागली. त्यामुळे ताडपत्री, प्लॅस्टिक अच्छादनाच्या खरेदीसाठी अनेकजण बाजारात दिसून आले. ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांनी गोठ्यावर टाकण्यासाठी, कडबा झाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्रीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. अनेकांनी घरावरील, गोठ्यावरील टीनपत्रेही बदलून घेण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा - कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
मेनकापड, ताडपत्री खरेदीची लगबग
पावसाळ्याची चाहूल लागली असल्याने घर, चारा, धान्य झाकून ठेवण्याची लगबग सगळीकडे पहावयास मिळत आहे. बाजारात मेनकापड, ताडपत्री, प्लास्टिक पोते मोठ्या प्रमाणात विकावयास आली आहेत. पारंपरिक ताडपत्री पेक्षा प्लास्टिकच्या ताडपत्रींना अधिक मागणी आहे. त्याच्या जाडीनुसार त्याच्या किमती आहेत. पारंपरिक ताडपत्री पेक्षा प्लास्टिकच्या ताडपत्रींना अधिक मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कडब्याची गंजी, घर, झोपडी, चारा यासाठी प्लास्टिक ताडपत्री शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. एकंदरीतच बाजारात मोठी गर्दी दिसत आहे.
हे देखील वाचाच - सावधान : आता चोरट्यांचा मोर्चा रुग्णालयांकडे
छत्र्या दुरुस्तींचीही धांदल
चार दिवसांपासून मोसमी पावसाने प्रारंभ केला आहे. छत्री, रेनकोट, पावसाळी टोप्या यांसह नागरिकांचा वावर सुरू आहे. अडगळीत पडलेल्या छत्र्या दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना लॉकडाउनमध्येही चांगली कमाई होत आहे. शहराच्या प्रमुख चौकात हे कारागीर बसलेले आहेत. ग्राहकांची छत्र्या दुरुस्तीसाठी गर्दी होत आहे. एसटी स्थानकासमोरील चौकात त्याचप्रमाणे शहराच्या अन्य प्रमुख चौकातून हे दुरुस्ती करणारे कारागीर आहेत. गावातून फिरून छत्र्या दुरुस्ती करण्याचा प्रयत्नही काही कारागीर करीत आहेत.
येथे क्लिक कराच - ‘या’ तालुक्यात खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ...!
पावसाळ्यामध्ये हंगामी स्वरूपात या व्यवसायातून काही पैसे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पावसाने सुरवात केल्याने आता या कारागिरांना चांगले काम उपलब्ध झालेले आहे. या छत्र्या दुरुस्तीबरोबरच पावसाळ्यामध्ये प्लास्टिक कागदांचा वापरही मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. ग्रामीण भागातील लोक त्या कागदांचा सर्रास वापर करीत असतात. शेतीची औजारे, झोपड्या यांना अच्छादन म्हणून या कागदाचा वापर केला जातो. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन छत्र्या खरेदीसाठी सुद्धा नागरिकांची गर्दी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.