Mon, October 2, 2023

Nanded; नापिकी,कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
Published on : 14 September 2022, 3:48 am
नांदेड : गोळेगाव (ता. लोहा) येथील शेतकरी शंकर जयराम कपाळे (वय ४२) हे अतिपावसामुळे झालेली नापिकी तसेच बॅंकेचे व पिकविम्याचे कर्ज कसे फेडावे त्याचबरोबर दिव्यांग मुलींचा उपचार कसा करावा, मुलांचे शिक्षण कसे करावे या काळजीत होते.
त्या विवंचनेतूनच त्यांनी विषारी गोळ्या खाल्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजी कपाळे यांनी दिलेल्या माहितीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.