काशीफळाने दाखविली शेतकऱ्यांना काशी !

लक्ष्मिकांत मुळे
Saturday, 30 May 2020

अर्धापूर तालुक्यात सिंचनाची सुविधा असल्यामुळे या भागातील शेतकरी विविध भाजीपाला, फळ पिके घेतात. काशीफळ (भोपळा) हे वेलवर्गीय भाजीपाला पिक आहे. देशातील मोठ्या देवस्थानांतील अन्नदानात, मोठे हाटेल, आदी ठिकाणी काशीफळाला मागणी असते. पण यंदाच्या ऐन हंगामात कोरोनामुळे देशभर टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे देवस्थानातील अन्नदान, हॉटेल बंद आहेत. तसेच सुरवातीला माल वाहतूक बंद होती. याचा परिणाम काशीफळाच्या विक्री व वाहतूकीवर झाला. शेतात तोडणीस आलेले फळ वेलीवरच राहिली.

अर्धापूर, (जि. नांदेड) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून देशभर टाळेबंदी करण्यात आली. या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. नाशिवंत फळे, भाजीपाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना तर उत्पादन खर्च न निघाल्यमुळे जबर आशी किंमत मोजावी लागत आहे. तालुक्यातील काशीफळ उत्पादक शेतकऱ्यांना काशीफळ उकंड्यावर, जणावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे. यंदाच्या हंगामात काशीफळाने शेतकऱ्यांना जीवंतपणी  काशी दाखवली आहे. 

सुरवातीला माल वाहतूक बंद

या पिडीत शेतकऱ्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष नाही. झालेल्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करित आहेत. अर्धापूर तालुक्यात सिंचनाची सुविधा असल्यामुळे या भागातील शेतकरी विविध भाजीपाला, फळ पिके घेतात. काशीफळ (भोपळा) हे वेलवर्गीय भाजीपाला पिक आहे. देशातील मोठ्या देवस्थानांतील अन्नदानात, मोठे हाटेल, आदी ठिकाणी काशीफळाला मागणी असते. पण यंदाच्या ऐन हंगामात कोरोनामुळे देशभर टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे देवस्थानातील अन्नदान, हॉटेल बंद आहेत. तसेच सुरवातीला माल वाहतूक बंद होती. याचा परिणाम काशीफळाच्या विक्री व वाहतूकीवर झाला. शेतात तोडणीस आलेले फळ वेलीवरच राहिली. ही फळे उकंड्यावर व जणावरांपुढे टाकण्याची वेळ आली. उत्पन्न सोडाच पण लावलेल्या लागवडी खर्चही निघाला नाही. हे फळ केवळ भाजीसाठी उपयोगी असल्यामुळे विक्रीवर मर्यादा येतात.

हेही वाचा -  लॉकडाउन : नांदेडवरुन तीन विशेष रेल्वेने साडेचार हजार परप्रांतीय मायभूमीत

 

तातडीने अर्थिक मदत देण्याची गरज

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, पार्डी आदी परिसरात सुमारे ४०० ते ५०० एकरवर यंदा काशीफळाची लागवड करण्यात आली आहे. या पिकाला लागवडी खर्च मोठा येतो. तर सरासरी ५०० ते ७०० रूपये भाव प्रतिक्विंटल मिळतो. यंदा चांगल्या प्रतीची फळे आली. पण कोरोनामुळे हि फळे शेतातच लाॅकडाऊन झाली आहेत. शेतकऱ्यांना खूप मोठा अर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीबद्दल कुठेही नोंद नाही. प्रशासनाला काही देनेघेने नाही असे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यातील काशीफळ उत्पादकांना कोरोनामुळे खूप मोठा अर्थिक फटका बसला आहे. उत्पादन खर्चही निघाला नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. झालेल्या नुकसानिचे सर्वेक्षण करून तातडीने अर्थिक मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकरी केशवराव इंगोले पाटील यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers In Trouble Due To Halt In Sale Of Kashi Fruits, Nanded News