
नायगाव : अवकाळी पावसाने पेरलेले उगवले, पण मोसमी पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिणामी उन्हाच्या तीव्रतेमुळे उगवलेले कोवळ्या कोंबांची वाढ तर खुंटलीच. वाऱ्यामुळे ओलावा कमी होत असल्याने कोंब वाचविण्यासाठी अनेक गावांतील शेतकरी तुषारने पाणी देण्यास सुरवात केली आहे. मात्र, सर्वांनाच शक्य नसल्याने दुबार पेरणीचे संकट घोंघावत असल्याचे दिसून येत आहे.