
जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत.
नांदेड : महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, परभणीतील मुरुंबा गावात गेल्या आठवड्यातन दिवसापासून कोंबड्यांचा अचानक मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, या गावात एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर खबरदारी बाळगण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही.
जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत. सर्व स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आली आहे. भोकर तालुक्यातील प्रत्येक पोल्ट्री फार्मवर तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी दिपक बचंती हे भेट देऊन पाहणी करत असून प्रत्येक फॉर्म, मांस विक्रेते यांना सात ग्राम पर लिटर प्रमाणे सोडियम क्लोराइडची फवारणी तसेच फार्म परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - विधायक बातमी : भोकरमध्ये हुंडा न घेता लग्नसंबंध जोडून साखरपूडा उरकला
राष्ट्रमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी
नांदेड- राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मराठा सेवा संघ संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा येथे साजरी करण्यात येते, परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरील कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विजयनगर येथे पहिल्यांदाच युवा प्रतिष्ठान व विठ्ठल पाटील मित्रमंडळ विजयनगर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवानराव पाटील डक यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी हनुमान मंदिर समितीचे सचिव संभाजीराव शिंदे, संचालक बाबूराव कदम, दिगंबर पावडे, आनंद जाधव, मंगेश मोतेवार, भू- विकास बॅंकेचे मॅनेजर धीरज मराठे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हौसिंग सोसायटीचे मुख्याध्यापक संतोष कदम, कदम कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. अनिल कदम, ऍड. भाले, तटलगे, पंजाबराव कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावित व सूत्रसंचालन रवी ढगे यांनी केले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रा. अनिल कदम यांनी विचार व्यक्त केले. शेवटी जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुन्ना कदम कोंढेकर, डॉ. प्रशांत तावडे, वसंत भोसले, साई अस्पत, रवी ढगे, रामप्रसाद देशमुख यांनी परिश्रम घेतले.