खते, बियाणे सुरक्षित पुरविण्याचा अवलंबला मार्ग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या खर्चात यामुळे बचत होण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्रित खरेदी केल्यामुळे किंमतीमध्ये बचत होत असून सध्या बाजारात मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध आहेत. चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
 

नांदेड : कोरोनाच्या आव्हानात्मक काळात खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांची खते-बियाण्यांसाठी शहरात गर्दी होऊ नये म्हणून शेतकरी गटांना एकत्रित खरेदी करुन शेतकऱ्यांना खते व बियाणे थेट बांधावर उपलब्ध करुन देण्याचा सुरक्षित मार्ग अवलंबिला आहे. कृषि विभागाच्या पुढाकाराने खते व बियाणांचे प्रातिनिधिक वाटप गुंडेगाव येथे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. दोन) शेतकऱ्यांना बांधावर करण्यात आले.

अधिकारी-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी रविकुमार सुखदेव, कृषि अधिकारी सुनील सानप, कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे, गुंडेगावचे पोलीस पाटील भगवान हंबर्डे, नामदेव हंबर्डे व निवडक शेतकरी उपस्थिती होते. 

हेही वाचा.... फळपीक विमाधारकांना भरपाई द्या....कोण म्हणाले ते वाचा

खरीप हंगाम पूर्व तयारी मार्गदर्शन

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत खते-बियाणे खरेदी केल्यास आर्थिक बचतीसह कोरोनाच्या संसर्गापासून त्यांना दूर राहता येईल असे याप्रसंगी आमदार मोहन हंबर्डे म्हणाले. उपविभागीय कृषि अधिकारी श्री सुखदेव यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बिजप्रक्रिया, बियाणे निवड, खरीप हंगाम पूर्व तयारी याविषयी मार्गदर्शन केले.

हेही वाचलेच पाहिजे..... Video : उपयुक्त पावसानंतरच करावी खरीप पेरणी....कोण म्हणाले ते वाचा

शेतकऱ्यांनी घ्यावी स्वत:ची काळजी 
गुंडेगावचे कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे यांनी माती, पाणी परिक्षणाचे महत्व विषद केले व शेतकऱ्यांनी मृद तपासणी करुनच पिकांची लागवड करावी असे सांगितले. कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करुन शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कृषि सहाय्यक श्री. भंडारे यांनी आभार मानले.

आठ हजार १०० टन खताचा पूरवठा बांधावर 
नांदेड जिल्ह्यात सुमारे तीन हजार शेतकरी गट स्थापन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला. आतापर्यंत एक हजार ५३ गटांनी आठ हजार १०० टन खते आणि तीन हजार ३०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवले आहेत. या गटांना कृषि विभाग सहाय्य करीत आहे. 

चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी
शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या खर्चात यामुळे बचत होण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्रित खरेदी केल्यामुळे किंमतीमध्ये बचत होत असून सध्या बाजारात मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध आहेत. चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fertilizer, a safe way to supply seeds