नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा.... कसा तो वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ चे दिशा निर्देशानुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही.

नांदेड : रेल्वे बोर्डाच्या सुचनेनसार शुक्रवारपासून (ता. दोन) नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरु करण्यात आले आहे. यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 

कोरोनामुळे रेल्वे दोन महिन्यापासून बंद 
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मागील दोन महिन्यापासुन (ता. २३ मार्च) रेल्वे सेवा बंद होती. यानंतर सध्या केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शन सुचनानुसार रेल्वेची सेवा काही प्रमाणात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे रेल्वे बोर्डाच्या सुचनेनुसार आरक्षण शुक्रवारपासून सुरु झाले आहे. कार्यालयाच्या वेळा 
सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत, दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे. या काळात नांदेड विभागातील सहा स्थानकावर तिकीट बुकींग करता येइल. रेल्वे बोर्डाने ता. एक जूनपासून देशभर दोनशे विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. 

हेही वाचा....मित्रांसोबत पार्टीला गेला, अन् पुढे काय झाले ते वाचाच

नांदेड- अमृतसर - नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार
यात नांदेड विभागातून नांदेड- अमृतसर - नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. ही गाडी ता. एक जून रोजी नांदेड येथून (गाडी संख्या ०२७१५) नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच ता. तीन जून पासून अमृतसर येथून ही गाडी (संख्या ०२७१६) अमृतसर- नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. या गाडीस २२ डब्बे राहणार आहेत. यात वातानुकुलीत तसेच बिगर वातानुकूलीत डब्बे असतील. परंतु सामान्य म्हणजेच जनरल मात्र राहणार नाहीत. या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेस सारख्याच राहणार आहेत. 

हेही वाचेलच पाहिजे......मोफत तूरडाळ, चनाडाळीचे वितरण सुरु

दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे
महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ चे दिशा निर्देशानुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही. या पूर्वीच ठरविल्यानुसार श्रमिक विशेष गाड्यांचे नियोजन संबंधित राज्य सरकार करेल. प्रवाशांनी रेल्वे आरक्षण केंद्रावर, रेल्वे स्थानकावर येतांना तसेच रेल्वे गाडीत प्रवास करतांना भारत सरकारने तसेच संबंधित राज्य सरकारने कोरोनाचा (कोविड-१९) प्रसार रोखण्याकरिता दिलेल्या दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे. तसेच ते ज्या राज्यात प्रवासाने पोहोचतील त्या संबधिंत राज्याच्या कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्या  करिता दिलेल्या दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे.

प्रवाशांची होणार नाही तपासणी
विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येणार नाही. ज्या प्रवाशांना कोरोनाचे  (कोविड-19) कोणतेही लक्षण नसेल त्यांनाच या रेल्वे गाड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. याची प्रवाशांनी नोंद  रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयाच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally comfort to the train passengers in Nanded division .... how to read it