esakal | हिमायतनगर तालुक्यात स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

हिमायतनगर बातमी फोटो

हिमायतनगर तालुक्यात स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळल्याने खळबळ

sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर : तालुक्यातील घारापूर ते विरसनी अंतर्गत रस्त्यावर असलेल्या नाल्या शेजारी चार दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे. एकीकडे बेटी बचाओ- बेटी पढाओचा नारा सुरु असतांना स्त्री जातीचे अभ्रक मारुन टाकण्याचे उद्देशाने टाकून दिले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील रामदास रामदिनवार हे आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरुन आपल्या कामांसाठी याच अंतर्गत रस्त्यावरुन शुक्र्वारी (ता. १८) जात होते. दरम्यान घारापूर ते विरसनी अंतर्गत रस्त्यावरील नाल्याजवळ त्यांचा भ्रमणध्वनी वाजल्यामुळे गाडी थांबवली. यावेळी त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी चौकस बुद्धीने आजुबाजूला पहाणी केली असता नाल्याच्या कडेला एक स्त्री जातीचे जिवंत अर्भक पिशवीमध्ये आढळुन आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता हिमायतनगर पोलिस ठाण्याला घटनेची माहीती देवून त्या अर्भकास उचलून हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा - घाट रस्त्यांनी प्रवास करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल नाईक यांनी प्राथमिक उपचार करुन नांदेड येथील शिशू पालन गृहात पाठवले. चिमुकलीची तबियत ठणठणीत असल्याचे डाॅक्टराकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली असून तपासिक अंमलदारांना उपयुक्त सुचना केल्या आहेत. सदरचे अर्भक हे अनैतिक संबंधातून जन्मलेले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image