esakal | Video : बारदाना गोडाऊनला आग ; लाखोंचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

NND09KJP01.jpg

एमआयडीसी नवीन नांदेड भागात बारदाना तयार करणारे अनेक गुजराती व्यापाऱ्यांचे कारखाने आहेत. हंगाम सुरु होण्यापूर्वी त्यांच्या गोडावूनमध्ये ज्युट बारदाना, प्लॉस्टीक बारदाना आणि सुतळी साठविली जाते.

Video : बारदाना गोडाऊनला आग ; लाखोंचे नुकसान

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड  : नांदेड - हैदराबाद रोडवरील चंदासिंग कार्नरजवळ असलेल्या तुळशीदास देवजी बारदानावाले अॅण्ड कंपनी, निलेश इंडस्ट्रीज निलेश रज्जीभाइ या बारदानाच्या गोडावूनला शुक्रवारी (ता. आठ) रात्री साडेअकरा वाजता आग लागली. यात लाखो रुपयांचा बारदाना जळाल्याची माहिती सुत्रांनी दिली. आग विजविण्यासाठी एमआयडीसीची एक व नांदेड वाघाळा महानगरपालिकेल्या अग्निशामन दलाच्या तीन अशा चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

बारदाना कारखान्याचा भाग
एमआयडीसी नवीन नांदेड भागात बारदाना तयार करणारे अनेक गुजराती व्यापाऱ्यांचे कारखाने आहेत. हंगाम सुरु होण्यापूर्वी त्यांच्या गोडावूनमध्ये ज्युट बारदाना, प्लॉस्टीक बारदाना आणि सुतळी साठविली जाते. यानंतर आवश्यकतेनुसार ते कामगाराकडून बारदाना बनवुन घेतले जातात. 

हेही वाचा.....समाधानकारक पाणीसाठ्यामुळे यंदा दिलासा

शुक्रवारी रात्री लागली आग
नांदेड - हैद्राबाद रोडवर चंदासिंघ कॉर्नरजवळ असलेल्या तुळशीदास देवजी बारदानावाले ॲंड कंपनी, निलेश इंडस्ट्रीज निलेश रज्जीभाइ या बारदानाच्या गोडावूनला शुक्रवारी (ता. आठ) रात्री साडेअकरा वाजता आग लागली. यानंतर एमआयडीसीची एक व नांदेड वाघाळा महानगरपोलिकेच्या तीन अशा चार अग्निशामक गाड्याच्या माध्यमातुन चौदा हजार लिटर पाण्याचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररुपधारण केल्यामुळे आग आटोक्यात येण्यास बारा तासाचा अवधी लागला. 
   
हेही वाचलेच पाहिजे.....Corona Virus : रेड झोनमधून आलेले नांदेडचे प्रवाशी थेट पोचले घरी

पोलिसांची घटनास्थळी धाव
नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी पोचले होते. या आगीत लाखों रुपयांचा बारदाना जळून खाक झाला. शनिवारी (ता. नऊ) सकाळी दहापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. परंतु यानंतर दोन गाड्या वाढवून आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. 

घटनास्थळी मनपा आयुक्तांची भेट
एमआयडीसी भागात बारदाना गोडाऊनला लागली आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सकाळी दहा वाजता भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना योग्य त्या सुचना देवून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे निर्देश दिले. यावेळी मनपाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका
शनिवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या ५४ थ्रोट स्वॅब अहवालानुसार ४९ अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. तर तीन अहवाल अनिर्णीत कळविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह दोन रुग्ण पुरुष असून त्यांचे वय ५५ व ५७ वर्ष आहे. हे जम्मू काश्मीर येथील रहिवासी असून नांदेड श्री गुरुद्वारा येथे दर्शनासाठी आले होते. सद्यस्थितीत सदर तिन्ही रुग्णांवर महसूल इमारत कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन पॉझिटिव्ह अहवालामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० वर पोहचली आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

loading image