
मुदखेड : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बेकरी व स्वीट मार्टला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन्ही दुकाने खाक झाली. यामध्ये आठ लाखांचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी युवकांनी धाव घेतल्याने इतर दुकानांचे नुकसान टळले असून युवकांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.