नृसिंह जिनिंग फॅक्टरीला भीषण आग

अनिल कदम
Saturday, 30 May 2020


शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गिरीश किशनराव चिद्रावार यांच्या मालकीची शहरापासून जवळच असलेल्या तेलंगणातील मदनूर येथे नृसिंह जिनिंग फॅक्टरी आहे. सध्या येथे कापूस खरेदी व गठान करण्याची प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात वेग आला असल्याने फॅक्टरीत कच्चा माल व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात होते.

देगलूर, (जि. नांदेड) ः शहरापासून जवळच असलेल्या मदनुर (तेलंगणा) येथील नृसिंह जिनिंग फॅक्टरीला शनिवारी (ता.३०) रोजी पहाटे अचानक लागलेल्या आगीत कापसाचे गठान, बारदाने व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. देगलूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. 

हेही वाचा -  धक्कादायक ...! उघड्या वाहनातून रक्ताची वाहतुक -

शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गिरीश किशनराव चिद्रावार यांच्या मालकीची शहरापासून जवळच असलेल्या तेलंगणातील मदनूर येथे नृसिंह जिनिंग फॅक्टरी आहे. सध्या येथे कापूस खरेदी व गठान करण्याची प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात वेग आला असल्याने फॅक्टरीत कच्चा माल व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात होते. शनिवारी (ता.३०) रोजी पहाटे तीन वाजता फॅक्टरीतील कापसाचया गठाणला अचानकपणे आग लागली. बघता-बघता आगीने राैद रूप धारण केले. या मध्ये कापसाचे गठान २५० क्विंटल, रुई ५०० क्विंटल, सर्कि ४५०, बारदान आदी साहित्य जळून खाक झाले.

६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान 
या आगीत ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना देगलूरच्या अग्निशामक दलाला कळाल्यानंतर त्यांनी तेथे तात्काळ जाऊन आगीवर नियंत्रण आणले. अन्यथा बाजूस असलेल्या इतर मालास याचा धोका बसला असता. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान लक्ष्मण पाशमवार, शेख लायक, गफार ड्राइव्हर, रवी सोनकांबळे, रविराज कांबळे, श्रीनिवास येशमवार, अरुण आऊलवार यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

नायगाव आगीमुळे बंद
देगलूरमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदनुर येथे कापूस विक्रीसाठी जावे लागत होते, मात्र तेही आग लागल्याने तेथील केंद्र काही दिवस बंद राहणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचे बिलोली येथील कापूस केंद्र तर चालू होण्यापूर्वीच बंद अवस्थेत आहे. नायगाव आगीमुळे बंद आहे, तर धर्माबादमध्ये ग्रेडिंग करण्यावरून वांदे होत असल्याने देगलूरच्या शेतकऱ्यांपुढे दररोज नवे नवे संकट निर्माण होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire At Nrusinha Ginning Factory, Nanded News