esakal | नांदेड जिल्ह्यातील पहिली घटना : कंधार तालुक्यातील " या " गावची ग्रामपंचायत बिनविरोध, राजकीय नेत्यांना चपराक 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गावातच भावकी आणि पाहुणे आणि इतर समाज विचारांची देवाणघेवाण करत एक नवा आदर्श घआलून देत या गावकऱ्यांनी निवडणुकीच्या आधीच आपली ग्रामपंचायत बिनविरोध काढली. 

नांदेड जिल्ह्यातील पहिली घटना : कंधार तालुक्यातील " या " गावची ग्रामपंचायत बिनविरोध, राजकीय नेत्यांना चपराक 

sakal_logo
By
बा. पू. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : "गाव करील ते राव काय करील" असा प्रत्यय नुकताच भोजुचीवाडी (ता. कंधार ) येथील नागरिकांनी केला. येथील तरुणाईने एकत्र येऊन केली नव्या पर्वाला सुरवात. गावात तंटे वाढणार नाहीत, राजकारणातून जन्मोजन्मीचं वैर संपवण्यासाठी गाव गुण्यागोविंदाने एकत्र नांदला पाहिजे. गावातच भावकी आणि पाहुणे आणि इतर समाज विचारांची देवाणघेवाण करत एक नवा आदर्श घआलून देत या गावकऱ्यांनी निवडणुकीच्या आधीच आपली ग्रामपंचायत बिनविरोध काढली. 

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकोपा ठेवून रोजी भोजूचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा संकल्प करण्यात आला. हा संकल्प तडीस नेण्यासाठी येथील तरुणांनी एकत्र येऊन एका दिलाने ग्रामपंचायतचा विकास करण्याचे ठरले. गावचा विकास म्हणजे प्रत्येक नागरिकाचा विकास असे समजून गावात वैर वाढू द्यायचे नाही. गावातील मतदार, नागरिक एकत्र आले आणि त्यांनी गाव निवडणूकमुक्त बिनविरोध करण्याचा संकल्प केला. आज रविवारी (ता. २०) ठराविक नागरिकांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतचे सात सदस्य तयार केले. त्यामध्ये सतीश देवकते यांच्याकडे सरपंचपदाची धुरा सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - Good News:अर्धापूरच्या अमोल सरोदेच्या कार्याची युनिसेफने घेतली दखल, कोरोना काळात केले उत्कृष्ट काम -

भोजुचीवाडी ही प्रत्येकाची आहे असा मौखिक ठराव तयार करण्यात आला. या ठरावास सगळ्यांनी संमती दिल्याने गुलाल लावून नियोजित ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले. भोजुचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी आमदार रोहिदास चव्हाण, सेवानिवृत्त सनदी अधिकारी एकनाथ मोरे, शहराध्यक्ष वसंत पवार, पंचायत समिती सदस्य नवनाथ चव्हाण, अमोल चव्हाण, बालाजी कपाळे, सतीश कदम आंबेसांगवीकर, लोहा पालिकेचे विरीधी गटनेते पंचशील कांबळे आदींनी अभिनंदन केले आहे. 
  
खर तर गावकऱ्यांचे मनस्वी स्वागत 

सामाजिक दृष्ट्या खूप प्रगल्भ असलेल्या सतिश देवकत्ते यांच्याकडे सरपंचपद दिले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या हुशार, अभ्यासु युवा नेतृत्वाच्या हातात गावच्या विकासाची धुरा दिली आहे. याच धर्तीवर तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड व्हावी असे आवाहन करण्यात आले. 
- बाबासाहेब बाबर, काँग्रेस विधानसभा महासचिव

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image