
नांदेड : बिनविरोध निवड आणि जागा रिक्त राहिल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात अपेक्षेपेक्षा पाचशे मतदान यंत्रे कमी लागणार आहेत. जिल्ह्यात एकूण दोन हजार ९४७ प्रभागांमधील निवडणुकीसाठी दोन हजार ९५४ मतदान केंद्र राहणार आहेत.
ता. १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) शरद मंडलिक यांनी दिली. जिल्ह्यातील १०३ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध निघाल्याने तसेच चार ग्रामपंचायतीमधील रिक्त राहिलेल्या जागा वगळता उर्वरित जागा बिनविरोध निवडून आल्याने तेथे निवडणूक घेण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील १०१ जागा उमेदवार न मिळाल्याने रिक्त आहेत. रिक्त जागा वर नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रक्रिया सुरु होणार असल्याचे तेथे सध्या मतदान होणार नाही. गेल्या ११ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांची समन्वय साधून पूर्वतयारी केली आहे.
बुधवारी (ता. सात) तहसीलदार व त्यांच्या अधिपत्याखालील निवडणूक यंत्रणेला मतदान यंत्र ईव्हीएम तसेच साहित्याचे वितरण करण्यात आले. मतपत्रिका छपाई सुरु करण्यात आली असून आवश्यकतेनुसार टपाली मतपत्रिका अवलंब केला जाणार आहे. पुढील चार दिवसात मतदान यंत्रांची तपासणी करुन योग्य असल्याची खातरजमा केली जाणार आहे. ही सर्व यंत्रे त्या- त्या तालुक्याला देण्यात येणार असून निवडणूक यंत्रणेचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मतपत्रिका तयार झाल्यानंतर दुसरे प्रशिक्षण घेतले जाणार आहेत.
जिल्हा निवडणूक विभागाने साडेतीन हजार यंत्रांची तयार केली आहे. परंतु केवळ दोन हजार ९५४ मतदान केंद्र राहणार असल्याने उर्वरित यंत्र राखीव म्हणून वापरण्यात मदत झाली आहे. नांदेड जिल्ह्याला तीन हजारह ५३० कंट्रोल युनिट व तीन हजार ६७० बॅलेट युनिट प्राप्त झाले आहेत ही सर्व यंत्रणा नांदेड महानगरपालिका यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरलेले आहेत. एका मतदान केंद्रावर किमान ३२० या प्रमाणे भौगोलिक रचना व परिसरातील मतदारांना जवळचे पडणारे ठिकाणानुसार मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.