Nanded News : गोदावरी नदीत बुडून पाच तरुणांचा मृत्यू; बासर येथील घटना, मृत हैदराबादेतील
Monsoon Dangers : हैदराबादहून सरस्वती देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पाच तरुणांचा बासरजवळील गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. खोल पाण्यात गेलेल्या या तरुणांचे पाय गाळात अडकले होते.
नांदेड : गोदावरी नदीत स्नानासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाला. बासर (ता. निर्मल, तेलंगण) येथे रविवारी (ता. १५) दुपारी ही दुर्घटना घडली. हे सर्व १७ ते १८ वयोगटातील असून हैदराबादमधील येथील रहिवासी आहेत.