Sat, Sept 30, 2023

Nanded; जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक
Published on : 14 September 2022, 3:53 am
नांदेड : शहरातील इतवारा भागातील शांतीनगर येथे मिलिंद किराणा दुकानासमोरील रस्त्यावर पाच जण विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले.
पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्य आणि रोख दोन हजार ८९० रुपये जप्त केले आहेत. याबाबत फौजदार सय्यद बशिरोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस जमादार रसुल करत आहेत.