पीक कर्ज मिळत नसल्याने माजी नगराध्यक्षांचा आत्महत्येचा प्रयत्न

माधव शेंद्रे
Monday, 11 January 2021


पीक कर्ज मिळत नसल्याने अरुण लक्ष्मण आळणे या शेतकऱ्याने बँकेतीलच पंख्यास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक व पोलिसांनी त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. 
 

मांडवी (ता.किनवट, जि. नांदेड) ः पीक कर्ज मिळत नसल्याने अरुण लक्ष्मण आळणे या शेतकऱ्याने बँकेतीलच पंख्यास गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक व पोलिसांनी त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. 

कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही
परिसरातील कणकी सज्जात अरुण लक्ष्मण आळणे व त्यांची पत्नी करुणा आळणे यांच्या नावे चार एकर जमीन आहे. त्यांनी पीक कर्जासाठी भारतीय स्टेट बँकेच्या मांडवी शाखेत कागदपत्र दाखल केली होती. सहा महिन्यांपासून वारंवार चकरा मारुन विचारणा केली तरी कर्ज मिळाले नाही. अरुण आळणे हे सोमवारी (ता.११) दुपारी चारला पुन्हा चौकशीसाठी गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. 

हेही वाचा -  नांदेड- ​महावितरण कर्मचाऱ्यांची मनमानी; अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

गळफास घेण्याचा प्रयत्न 
त्यानंतर त्यांनी बँकेतील पंख्याला दोर बांधून आरडाओरड करत गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, उपनिरीक्षक विजय कोळी यांनी तातडीने धाव घेत त्यांना रोखले. त्यामुळे अनर्थ टळला. अरुण आळणे हे किनवटचे माजी नगराध्यक्ष आहेत.

 

बनावट नोटा चलनात आणणाऱ्यास अटक 
हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक बसस्थानक परिसरातील एका किराणा दुकानात दोनशे रूपयांची बनावट नोट चलनात आणणाऱ्या एकास येथील युवकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ११) सायंकाळी सहाच्या दरम्यान करण्यात आली. पोटा बुद्रुक (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे हाॅटेलसह किराणा माल व इतर विविध दुकाने असून नागरिकांची नेहमी गर्दी असते. ह्याच गोष्टीचा फायदा घेत शेख सत्तार शेख बाबू (रा. बारड, ता. मुदखेड) याने येथील दत्त कृपा किराणा दुकानात किरकोळ खरेदी करून दोनशे रूपयांची नोट दुकानदारास दिली. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात १३ लाख मतदार निवडणार गावचे कारभारी; १०६ ग्रामपंचायती बिनविरोध तर ९०७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान
 

फरार होण्यात यशस्वी 
मात्र सदर नोट बनावट असल्याचे दुकानदारास लक्षात येताच आजू बाजूस असलेले युवकास सांगीतले युवकांनी आरोपी शेख सत्तार यांची झडती घेतली आसल्यास त्याचाजवळ दोनशे रूपयांचा चोवीस बनावट नोटा आढळून आल्या युवकांनी हिमायतनगर पोलिसांनी कळविले येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन पो काॅ लाभसेटवार. कदम यांनी आरोपीला ताब्यात घेऊन हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात आणले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सरू होती दरम्यान आरोपी सोबत आणखी एक आरोपी होता असे येथील नागरिक सांगत असून तो फरार होण्यात यशस्वी झाला आहे आरोपी हा पुर्वी हिमायतनगर तालुक्यातील विरसणी येथील रहिवासी आसल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा - 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former mayors suicide attempt due to not getting crop loan nanded crime news