अपहारप्रकरणी माजी सरपंच, ग्रामसेवकावर न्यायालयाच्या आदेशावरुन गुन्हा

सामाजिक कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी प्रशासनाकडे वारंवार चौकशी करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी अनेकवेळा देगलूरचे गटविकास अधिकारी, मरखेल पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते.
संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
Updated on: 

मरखेल ( जिल्हा नांदेड ) : शासकीय निधीचा विकासकामांसाठी वापर न करता परस्पर निधी हडप केल्याप्रकरणी अंबुलगा (ता. देगलूर) येथील तत्कालीन महिला सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह नांदेडच्या सुमंगला इंटरप्रायझेस यांच्याविरुद्ध शासकीय निधीचा अपहार केल्याच्या आरोपाखाली मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. २०१७ साली पाणी शुद्धीकरण संयंत्रासाठी हा निधी आला होता.

२०१७ साली अंबुलगा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडून पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्याकरिता एक लाख ८९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. परंतु तत्कालीन सरपंच शाहूबाई नीळकंठ सुरनर तत्कालीन ग्रामसेवक व्ही. बी. भारती यांच्यासह काम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या नांदेडच्या सुमंगला इंटरप्रायझेस आदींनी संगनमत करुन पाणी शुद्धीकरण यंत्र न बसवता वरील निधीचा परस्पर अपहार केला.

हेही वाचा - शहरातील नांदेड नाका भागात शनिवारी सकाळी अकरा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली

सामाजिक कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी प्रशासनाकडे वारंवार चौकशी करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी अनेकवेळा देगलूरचे गटविकास अधिकारी, मरखेल पोलिस ठाण्यात निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. दरम्यान जाधव यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने उपरोक्त तिघांवर मरखेल पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास जमादार प्रभाकर गुडमलवार हे करीत आहेत.

तालुक्यातील जवळपास सर्व ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरण संयंत्रासाठी शासनाकडून निधी आलेला होता. बऱ्याच ठिकाणी यंत्र न बसवता निधी हडपण्यात आला. तर बहुतांश ठिकाणी यंत्र धूळखात पडल्याचे दिसून येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com