नांदेड विभागात चार लाख टन उसाचे गाळप, दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन

प्रल्हाद कांबळे
Friday, 20 November 2020

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते.

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात १३ साखर कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी बुधवार अखेर (ता. १८) चार लाख टन उसाचे गाळप झाले तर दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या
सुत्रांनी दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. परंतु आजपर्यंत १३ कारखान्यांनीच गाळप सुरु केले आहे. यात चार सहकारी तर नऊ खासगी कारखान्याचा समावेश आहे. या १३ कारखान्यांनी बुधवार अखेर (ता. १८) तीन लाख ९९ हजार ६३७ टन उसाचे गाळप केले आहे. तर यापासून दोन लाख ६३ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ६.५८ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सुत्रांने दिली.

हेही वाचा - Good News:नांदेड- पनवेल- नांदेड उत्सव विशेष गाडीला मुदतवाढ -

गाळप सुरु केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातील हडसणी येथील सुभाष शुगर लिमिटेड, कुंटूरकर शुगर्स लिमीटेड, कुंटूर व व्यंकटेश्वरा शुगर लि.
शिवणी या कारखान्यांचा समावेश आहे. तर हिंगोलीमधील पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमत, कपिश्वर शुगर लि. बाराशिव, शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी. परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानखेड, योगेश्वारी शुगर लि. लिंबा, रेणुका शुगर लि. पाथरी, त्रिधारा शुगर लि. अमडापूर हे कारखाने सुरु झाले आहेत. तर लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी साखर कारखाना लि. लातूर, मांजरा सहकारी साखर कारखाना विलासनगर, पन्नगेश्वर शुगर लि. पानगाव हे कारखाने सुरु झाले आहेत.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनात साखर उत्पादन क्विंटलमध्ये)
जिल्हा...कारखाने...ऊस गाळप...साखर उत्पादन
नांदेड...तीन...९६,२६०...६५,४००
लातूर...तीन...७९,७१०...४६,२६०
परभणी...चार...१,४४,९७७...९७,९४०
हिंगोली...तीन...७८,६९०...५३,५५०
एकूण...१३...३,९९,६३७...२,६३,१५०.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four lakh tonnes of sugarcane crushed and two lakh 63 thousand quintals of sugar produced in Nanded division nanded news